शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

बीड बसस्थानकाचे १४ कोटींचे बांधकाम परवान्याअभावी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 01:07 IST

बीडमधील बसस्थानक, विभागीय कार्यालय आणि आगाराचे नुतनीकरण करण्यासाठी १४ कोटींचा निधी प्राप्त झाला. मात्र, केवळ बांधकाम परवाना नसल्याने हे काम अद्यापही सुरू झालेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीडमधील बसस्थानक, विभागीय कार्यालय आणि आगाराचे नुतनीकरण करण्यासाठी १४ कोटींचा निधी प्राप्त झाला. मात्र, केवळ बांधकाम परवाना नसल्याने हे काम अद्यापही सुरू झालेले नाही. सहा महिन्यांपासून अद्यापही विकास शुल्काचा तिढा सुटलेला नाही. रापम हे शासनाच्या आखत्यारित असतानाही बीड पालिकेकडून शुल्काची आकारणी केली जात असल्याचे समोर आले आहे.बीड बसस्थानकाच्या नुतीनकरणच्या कामाचे कार्यादेश १६ एप्रिल २०१९ रोजी निघाले होते. यासाठी १४ कोटी ३८ लाख २८ हजार ४५ रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. यामध्ये बीड बसस्थानासह आगार व विभागीय कार्यालयाचाही समावेश होता. या कामाचे भूमिपूजन सध्याचे मंत्री आदित्य ठाकरे व तत्कालिन परीवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते ४ आॅगस्ट २०१९ रोजी झाले होते. त्यानंतर वर्षभरात हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा बीडकरांना होती. मात्र, या कामाचा बांधकाम परवान्याचा तिढा अद्यापही संपलेला नाही. बीड पालिका आणि राज्य परीवहन महामंडळाचे यावरून वाद सुरू असल्याचे दिसत आहे.दरम्यान, पालिकेकडून या बांधकामाला विकास कर हा १ कोटी ३२ लाख रूपयांचा आकारण्यात आला आहे. तर रापमने आपण शासनाचाच भाग असल्याचे सांगत खाजगी व्यक्तीप्रमाणे कर न आकारण्याबाबत वारंवार पत्र व्यवहार केला. मात्र, यावर तोडगा निघाला नाही. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रापम व बीड पालिका अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. यात मुख्याधिका-यांना तात्काळ कार्यवाही करून बांधकाम परवाना देण्याबाबत आदेशित केले होते. मात्र, सहा महिने उलटूनही अद्याप यावर पालिकेने कसलीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे बांधकाम बंद करण्याची नामुष्की रापमवर ओढावली आहे.रापम विभागही शासनाचाच भागमहाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ च्या प्रकरण ६ अ अंतर्गत कलम १२४ फ नुसार महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळ हे शासनाच्या नियंत्रणाखाली असल्याचे पत्र रापम महाव्यवस्थापक (बांधकाम) यांनी सहसंचालक नगर रचना विभाग औरंगाबाद यांना दिले आहे.१९ आॅगस्ट २०१९ रोजी सदरील पत्र देण्यात आले होते. असे असताना पालिकेकडून कारवाई करण्यास आखडता हात घेतला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.महाव्यवस्थापक,सहसंचालकांकडे प्रकरणआता हे प्रकरण रापमचे महाव्यवस्थापक व नगर रचना विभागाच्या सहसंचालकांच्या दालनात गेले आहे. यापूर्वीही बीड पालिकेने नगर रचना विभागाचे मार्गदर्शन मागविले होते.महाव्यवस्थापकांनी सहसंचालकांना पत्र पाठवून चार महिने उलटूनही यावर काहीच कारवाई झाली नसल्याचे दिसत आहे.

टॅग्स :state transportएसटीMuncipal Corporationनगर पालिका