बीड : ऊस तोडणीसाठी आणलेले उचलीचे पैसे तुमच्याकडून मी घेतले, असे लोकांना का सांगितले या कारणावरून मुलाने वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून काठी डोक्यात मारून जखमी केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा येथे घडली. याप्रकरणी शंकर ग्यानबा चामनर यांच्या फिर्यादीवरून मुलगा सुग्रीव शंकर चामनरविरूद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास पोलीस हवालदार दौंड करीत आहेत.
---------
पैसे देण्याच्या कारणावरून डोके फोडले
बीड : पैसे देण्याच्या कारणावरून मारहाण करीत लोखंडी गज मारून डोके फोडून एकास जखमी केल्याची घटना माजलगाव येथील तहसील रोडवर सोमवारी दुपारी घडली. जखमी ज्ञानेश्वर सुरेश पापाकानडे (रा. मालीपारगाव, ता. माजलगाव) यांच्या फिर्यादीवरून अमोल अडागळे, संजय अडागळे (रा. खापरवाडी, ता. वडवणी, ह. मु. शेलापुरी) यांच्याविरूद्ध माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
-------
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा
बीड : मोबाईल चोरल्याचा आरोप करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याने पतीने आत्महत्या केल्याची फिर्याद रेखा दत्तात्रय लगसकर यांनी धारूर पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी वंदना उद्धव नेमटे, उद्धव नेमटे, गणेश लगसकर, भागवत लगसकर (रा. आडस) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून, तपास पोलीस उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.