शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

मुलाने केलेली मारहाण जिव्हारी लागली; बापाने पहाटेच पोटच्या गोळ्यावर कुऱ्हाड घातली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 10:50 IST

पहाटेच्या गाढ झोपेत असताना जन्मदात्या बापाने केला मुलावर प्राणघातक हल्ला

ठळक मुद्देआष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील घटना

- नितीन कांबळेकडा : मुलाने विनाकारण दोन तीन वेळा मारहाण केल्याचा राग मनात धरून दारूच्या नशेत असलेल्या बापाने पहाटेच्या गाढ  झोपेत असलेल्या मुलावर कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला केला. यात मुलगा गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे.  आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील बाबासाहेब किसन खंडागळे हा मोलमजुरी करून राहतो. मुलगा राहुल खंडागळे वय 30  वर्ष  याने तीन वेळा विनाकारण बापाला  मारहाण केली होती. याचा राग मनात धरून सोमवारी पहाटे घरात मुलाबाळासह झोपलेल्या मुलावर कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला केला. यात मुलगा राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे दाखल केले पण प्रकृती चिंताजनक  असल्याने त्याला अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे.

आष्टी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सलिम पठाण,  पोलीस नाईक संतोष नाईकवाडे, पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब  भगत, बंडू दुधाळ, वाहन चालक बांगर यांनी  आरोपी बाबासाहेब किसन खंडागळे याला ताब्यात घेतले आहे. 

ऐरवी झोपायला बाहेर पण तो झोपला घरीच 

मुलाने दोन तीन वेळा मारहाण केली होती. तो राग मनात होता. ऐरवी घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या शेडमध्ये झोपायला असलेला बाप मुलाला जिवे मारण्याचा चंग मनात बांधुन तो घरी झोपायला आला आणि पहाटेच्या सुमारास त्याने मुलावर कुर्‍हाडीने हल्ला केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडPoliceपोलिस