शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या आई, मुलाला बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:59 IST

पैशासाठी कोण काय करेल आणि कोणाला सोबत घेईल, याची शाश्वती नसते. असाच काहीसा प्रकार बुधवारी सायंकाळी बीडमध्ये घडला. चक्क आई आणि मुलगाच कुंटणखाना चालवित असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. यात एका महिलेची सुटका करून आई व मुलाला बेड्या ठोकल्या.

ठळक मुद्देअनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाची कारवाई

बीड : पैशासाठी कोण काय करेल आणि कोणाला सोबत घेईल, याची शाश्वती नसते. असाच काहीसा प्रकार बुधवारी सायंकाळी बीडमध्ये घडला. चक्क आई आणि मुलगाच कुंटणखाना चालवित असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. यात एका महिलेची सुटका करून आई व मुलाला बेड्या ठोकल्या. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने शहरातील धानोरा रोड परिसरात केली.

पोलिसांच्या माहितीनूसार ६५ महिला आपल्या ३० वर्षीय मुलाच्या मदतीने कुंटणखाना चालविते. धानोरा रोड भागात त्यांचे दोन मजली घर आहे. तिसºया मजल्यावर हा व्यवसाय चालविण्यासाठी एक खोली तयार केली आहे. ग्राहकांकडून मागणी येताच हे दोघेजण महिला व मुलींना बोलावून घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. बुधवारी सकाळी याची माहिती पोलीस उपनिरीक्षक भारत माने, दीपाली गित्ते यांना मिळाली. त्यांनी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांना ही माहिती कळविली. त्यांच्या आदेशाप्रमाणे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे, भारत माने, दीपाली गित्ते, सिंधु उगले, मिना घोडके, शेख शमिम पाशा, गोरख राठोड यांनी सापळा लावला. डमी ग्राहक पाठवून त्यांनी ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर ठाण्यात नोंद नव्हती.आठवड्यात दुसरी कारवाईतीन दिवसांपूर्वीच याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका उच्चभ्रू वस्तीमध्ये धाड टाकून एका महिलेची सुटका करून एका आरोपीला अटक केली होती. त्यानंतर बुधवारी पुन्हा ही कारवाई केली. आठवड्यातील ही दुसरी कारवाई आहे.

टॅग्स :BeedबीडMarathwadaमराठवाडाPoliceपोलिस