शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीड शहर अंधारात; आता कचराही दिसेल जागेवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:01 IST

बीड : येथील नगर पालिकेत काम करणाऱ्या कामगार आणि कर्मचाऱ्यांचे वेतन मागील तीन महिन्यांपासून थकले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची ...

ठळक मुद्देबीड पालिका : तीन महिन्यांपासून वेतन थकल्याने उपासमारीची वेळ

बीड : येथील नगर पालिकेत काम करणाऱ्या कामगार आणि कर्मचाऱ्यांचे वेतन मागील तीन महिन्यांपासून थकले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. विद्यूत विभागाच्या कर्मचाºयांनी दहा दिवसांपासून काम बंद केल्याने पथदिवे बंद असल्याने शहर अंधारात आहे. आता स्वच्छता विभागाचे कर्मचारीही काम बंद करण्याच्या पावित्र्यात असल्याने शहरातील कचरा जागेवरच दिसणार आहे. पालिकेचा हा गलथान कारभार आता सर्वसामान्यांसाठी त्रासदायक ठरणार असल्याने पालिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.बीड पालिकेतील कारभार पूर्णपणे ढेपाळला आहे. पालिकेत कोणाचे कोणावर नियंत्रण राहिले नाही. आओ जाओ घर तुम्हारा, अशी काहीसी परिस्थिती सध्या दिसून येत आहे. उपजिल्हाधिकारी मिलींद सावंत यांच्याकडे पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार आहे. त्यांच्याकडे पालिकेबद्दल विचारणा केल्यावर, आपण निवडणूकीच्या कामात असल्याचे सांगून ते दुर्लक्ष करतात.त्यांना पालिका आणि शहराची कसलीच काळजी नसल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे. सावंत यांच्या कामकाजाबद्दल आता सर्वसामान्य आणि पालिका कामगार, कर्मचाºयांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.त्यांच्या दुर्लक्षामुळेच आज शहर घाणीच्या साम्राज्यात आणि अंधारात आहे. त्यांनी लक्ष न दिल्यामुळेच आज कामगार, कर्मंचाºयांचे तीन महिन्यांपासून वेतन रखडले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यावर तात्काळ कार्यवाही करून वेतन अदा करावे, आणि बीडकरांचे हाल थांबवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.दरम्यान, मागील दोन महिने पालिकेने बील थकविल्याने शहरातील पथदिवे बंद होते. तर आता विद्यूत विभागाच्या १२ कर्मचाºयांचे वेतन थकल्याने त्यांनी पथदिवे चालू, बंद करणे सोडले आहे. त्यामुळे १० दिवसांपासून शहर अंधारात आहे. तर दुसºया बाजूला स्वच्छता विभागातील १७ घंटागाडी चालकांचेही वेतन मिळाले नाही.वारंवार मागणी करूनही त्यांना टोलवाटोलवी केली जात आहे. त्यामुळे ते सुद्धा आता काम बंद करण्याच्या पावित्र्यात आहेत. त्यामुळे शहरातील कचरा उचलण्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. यासह पालिकेत काम करणाºया कर्मचाºयांचेही वेतन थकल्याने संताप व्यक्त होत आहे.या सर्वांचे वेतन तात्काळ अदा करून त्यांच्यावर आलेली उपासमारीची वेळ थांबवावी, अशी मागणी मनविसेचे शैलेष जाधव यांनी केली आहे.दरम्यान, विद्युत विभागाच्या अभियंता कोमल गावंडे यांची भेट न झाल्याने त्यांची बाजू समजली नाही. त्यांच्या कर्मचाºयाला विचारणा केली असता, आपण याबद्दल काही बोलू शकत नाही, मॅडमलाच विचारुन घ्या, असे सांगितले. गावंडे यांचा भ्रमणध्वनी नसल्याने उशिरापर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. स्वच्छता विभागाचे प्रमुख व्ही. टी. तिडके म्हणाले, हा विषय तात्काळ मार्गी लावला जाईल.कामगार, कर्मचाºयांवर दबाववेतन थकले तरी काम करीत रहा, अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल, असे म्हणत काही अधिकारी कामगार, कर्मचाºयांवर दबाव आणत आहेत. मात्र काहीजण आता आक्रमक झाले असून कामबंद करण्याच्या पावित्र्यात आहेत. वेतन थकल्याने आम्ही कुटूंब कसे चालवायचे, महामानवांची जयंती कशी साजरा करायची? असा सवालही काही कर्मचाºयांनी अधिकाºयांना उपस्थित केला आहे. असे असले तरी अधिकाºयांनी मात्र या प्रश्नाकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे.

टॅग्स :BeedबीडEmployeeकर्मचारीagitationआंदोलन