शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत सुटीवर जाताना काळजी घ्या; बीड पोलिसांचे आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 15:41 IST

दिवाळीत सुटी मिळाल्यानंतर गावी किंवा इतर ठिकाणी जाताना काळजी घेण्याचे आवाहन बीड पोलिसांनी केले आहे.

ठळक मुद्दे- घराला मजबूत कुलूप लावा,-  पोलीस ठाण्यालाही द्या माहिती

बीड : दिवाळीत सुटी मिळाल्यानंतर गावी किंवा इतर ठिकाणी जाताना काळजी घेण्याचे आवाहन बीडपोलिसांनी केले आहे. घराला मजबूत कुलूप लावण्याबरोबरच आपण बाहेरगावी जात असल्याची माहिती जवळील पोलीस ठाण्याला देणे आवश्यक आहे. तसेच  प्रवासादरम्यानही चोरांपासून सावधानता बाळगावी, असे आवाहनही पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनीं केले आहे.

दिवाळी हा सण अवघ्या पंधरवाड्यावर येऊन  ठेपला आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांना सुट्या लागताच त्यांना गावी किंवा मामाच्या गावी जाण्याचे वेध लागते. तसेच बाहेरगावी असलेले नौकरदार, माहेरी जाणाऱ्या विवाहिता आदींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु हे करताना प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या घरात जास्त रोख रक्कम किंवा दागिने व इतर किंमती ऐवज जास्त ठेवू नये, ठेवला तर तो सुरक्षित ठेवावा. तसेच आपल्या घराच्या आजुबाजूला राहणाऱ्यांसह जवळील पोलीस ठाण्याला कल्पनाही देणे गरजेचे आहे. यामुळे पोलीस आपल्या भागात जास्त गस्त घालू शकतात. त्यामुळे चारी, घरफोडी होणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. यासंदर्भात सर्व पोलीस ठाण्यांना माहिती देऊन जनजागृती करण्यासंदर्भात कळविले जाईल, असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी सांगितले. 

गर्दीत घ्या काळजी..बसस्थानक, रेल्वे स्थानक, थांबे आदी ठिकाणी प्रवाशांची गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन पर्स, पॉकेट, दागिने, बॅग लंपास करण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्दीत गेल्यानंतर नागरिकांनी काळजी घ्यावी. एखादी व्यक्ती संशयीत वाटल्यास तात्काळ पोलिसांना संपर्क करावा, असे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रमुखांनी केले आहे.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी