शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मराठा तरुणांना बँकांनी कर्ज उपलब्ध करुन द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 00:20 IST

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील मराठा समाजातील तरुणांनी उद्योग उभारून रोजगार निर्मिती करावी यासाठी महामंडळाच्या योजनेअंतर्गत बॅँकेच्या वतीने कर्ज दिले जाते. मात्र अनेक ठिकाणी कर्ज देण्यासाठी बँकांकडून टाळाटाळ होत आहे.

ठळक मुद्देनरेंद्र पाटील यांची सूचना : मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील मराठा समाजातील तरुणांनी उद्योग उभारून रोजगार निर्मिती करावी यासाठी महामंडळाच्या योजनेअंतर्गत बॅँकेच्या वतीने कर्ज दिले जाते. मात्र अनेक ठिकाणी कर्ज देण्यासाठी बँकांकडून टाळाटाळ होत आहे.त्यामुळे तात्काळ कर्ज उपलब्ध करुन देण्याची सूचना बँकांना दिल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी बीड येथील आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली.यावेळी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, मराठा मोर्चा समन्वय समितीचे अ‍ॅड. मंगेश पोकळे, भाजयुमोचे स्वप्निल गलधर, प्रमोद पुसरेकर,शिवसेनेचे गणेश मस्के व महामंडळ सदस्यांची उपस्थिती होती.महामंडळाच्या पुढील उपक्रमाविषयी बोलताना पाटील म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाकडे एकूण १७० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध आहे. यामध्ये राज्य शासनाच्या वतीने अजून ४०० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला आहे. या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविलेल्या योजनांचा लाभ अधिकाधिक मराठा तरुणांनी घ्यावा व उद्योजक बनावे असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.राज्यसरकारने महामंडळासाठी पुरेसा निधी दिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठा समाजातील तरूणांना उद्योगासाठी बँकांकडून अर्थसहाय्य मिळेल. आज पर्यंत मराठा समाजातील तरूण उद्योगांसाठी कधीच कर्ज मागत नव्हता. त्यामुळे यावेळी कजार्साठी लागणारे कागदपत्र गोळा करण्यासाठी अडथळे येऊ शकतात. मात्र या महामंडळाबाबतची सर्व माहिती आॅनलाईन उपलब्ध आहे. कर्जासाठी अर्ज देखील आॅनलाईनच करावयाचा आहे. याबाबतीत नागरिकांच्या माहितीसाठी जिल्हास्तरावर प्रशिक्षण देखील घेण्यात येणार असल्याचे यावेळी पाटील म्हणाले. यावेळी शहरातील मराठा समाजातील प्रतिष्ठित पदाधिकारी, सर्वपक्षीय कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

टॅग्स :BeedबीडmarathaमराठाBanking Sectorबँकिंग क्षेत्र