केज : अडविलेला शेतरस्ता खुला करून देण्यात यावा, या मागणीसाठी बोबडेवाडी येथील शेतकरी गुरुवारपासून आपल्या बैल बारदाण्यासह तहसील कार्यालया समोर उपोषणाला बसले आहेत.तालुक्यातील बोबडेवाडी येथील गट नंबर १९९, १२०, ११८ मध्ये प्रवीण त्रिंबक बोबडे, अरुण संपत मावकर, शिवाजी भीमराव चौरे आणि तुकाराम सखाराम बारवकर यांच्या शेत जमिनी आहेत. त्यांना शेतात जाणे-येणे व जमीन कसण्यासाठी त्याच गट नंबरमधून जुना रस्ता आहे; परंतु हा रस्ता दत्तात्रय भीमराव ससाणे व हरिश्चंद्र भीमराव ससाणे या दोघांनी रस्त्यावर विहिरीचा भराव व दगडगोटे टाकून रस्ता बंद केलेला आहे. यामुळे वरील शेतकऱ्यांना त्यांना शेतीची पूर्वमशागत आणि वहितीसाठी अडचण निर्माण होत आहे.दरम्यान या पूर्वी देखील गतवर्षी ४ जून २०१८ रोजी अशाच प्रकारे अडवणूकीचा प्रकार झाला होता. त्यावेळी तहसीलदार आणि संबंधित शेतकऱ्यांनी पावसाळा संपल्यानंतर जमिनीची मोजणी करून हद्द कायम होताच रस्ता तयार करण्यासाठी अतिक्रमण व अडथळे काढण्याचे कबूल करीत शपथपत्र सादर केले होते.त्यानंतरसुद्धा पुन्हा अतिक्रमण करून रस्ता बंद केल्यामुळे गुरुवारपासून प्रवीण त्रिंबक बोबडे, अरुण संपत मावकर आणि शिवाजी भीमराव चौरे हे शेतकरी बैलगाडी, बैलबारदाण्यासह केज तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत.
शेतरस्त्यासाठी बैल, बारदाण्यासह उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 23:53 IST
अडविलेला शेतरस्ता खुला करून देण्यात यावा, या मागणीसाठी बोबडेवाडी येथील शेतकरी गुरुवारपासून आपल्या बैल बारदाण्यासह तहसील कार्यालया समोर उपोषणाला बसले आहेत.
शेतरस्त्यासाठी बैल, बारदाण्यासह उपोषण
ठळक मुद्देबोबडेवाडीचे शेतकरी केज तहसीलसमोर : शेतीची पूर्वमशागत आणि वहितीसाठी अडचण; पुन्हा केले अतिक्रमण