आष्टी पोलीस ठाण्यांतर्गत कडा पोलीस चौकी येते. या चौकीअंतर्गत २३ गावे असून पाच कर्मचारी, एक चालक, एक अधिकारी असा सात जणांचा कर्मचारी वर्ग आहे. अनेक वर्षांपासून या ठिकाणी चौकीची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर चौकीची दुरवस्था झाली असून चौकीच्या छतावरील पत्रे, शौचालयाचे लिकेज, फरशी उचकटलेली, गेट तुटलेले, अंघोळीसाठी नसलेली व्यवस्था,परिसरात वाढलेले गवत त्यामुळे चौकीला अवकळा आली आहे. अशा वातावरणात कर्मचाऱ्यांचे कामासाठी मनही लागत नाही. एखाद्यावेळी पत्र्याचा तुकडा पडला तर गंभीर दुखापत होऊ शकते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.
महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने कुचंबना होत आहे. या चौकीत फार जुने शौचालय आहे. येथे कधी महिला कर्मचारी येतात तसेच विविध घटना किंवा भांडण-तंटे झालेल्या महिलाही येथे येतात. मात्र, त्यांची कुचंबना होताना दिसत आहे.
याबाबत आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.
फोटोओळ- ठिकठिकाणी दुरवस्था झालेली चौकी दिसत आहे.
===Photopath===
040321\04bed_3_04032021_14.jpg~040321\04bed_2_04032021_14.jpg