शहरं
Join us  
Trending Stories
1
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
2
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
3
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
4
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
5
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
6
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
7
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
8
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
9
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
10
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
11
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
12
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
13
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
14
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
15
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
16
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
17
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
18
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
19
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
20
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री

औरंगाबादच्या मुलाने बीडच्या अल्पवयीन मुलीला पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 15:41 IST

यापूर्वीही औरंगाबाद पोलिसांनी घेतले होते ताब्यात

ठळक मुद्देअपहरणाचा गुन्हा दाखल 

बीड : शिक्षणासाठी औरंगाबाद येथे असलेल्या अल्पवयीन मुलीस तेथील मुलाने आपल्या मैत्रिणीच्या मदतीने बीडमधून पळवून नेले. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, यापूर्वीही या जोडप्याने पलायन केले होते. त्यावेळी औरंगाबाद शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन आई-वडिलांच्या स्वाधीन केले होते.

सोनाली (वय १६ रा.बीड नाव बदलले) या मुलीला वडिलांनी शिक्षणासाठी औरंगाबादला ठेवले होते. अकरावीच्या वर्गात शिक्षण घेणारी सोनाली दोनच महिने औरंगाबादला राहिली. त्यानंतर तिने औरंगाबादमधीलच गणेश (नाव बदललेले) मुलासोबत पलायन केले. औरंगाबाद पोलिसांना हे दोघेही संशयास्पद रित्या दिसले. त्यांनी दोघांनाही ताब्यात घेत आई-वडिलांना कळविले. मुलीच्या आई-वडिलांना हा प्रकार समजल्यानंतर  तिला बीडला आणले. तरीही हे दोघे फोनवरून बोलतच असावेत, असा संशय होता. यातूनच त्यांनी पुन्हा मंगळवारी सकाळी पलायन केले.दरम्यान, गणेशने सोनालीला पळविण्यासाठी आपल्या एका मैत्रिणीचीही मदत घेतल्याचे समोर आले आहे. सोनालीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश व तिच्या मैत्रिणीवर लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि महेश टाक हे करीत आहेत.मोबाईलमध्ये सापडले फोटोदरम्यान, सोनाली व गणेश या दोघांचे फोटो मोबाईलमध्ये सापडले होते. हाच प्रकार लक्षात आल्यानंतर सोनालीला औरंगाबादहून बीडला आणले होते. मात्र तरीही तिने घरच्यांची नजर चुकवून पलायन केल्याचे सांगण्यात आले. सध्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपासातून खरा प्रकार समोर येणार आहे. 

टॅग्स :KidnappingअपहरणBeedबीडAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस