शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात एप्रिलमध्ये १५ वाळूपट्ट्यांचे लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:34 IST

बीड जिल्ह्यातील पंधरा वाळूपट्ट्यांचे लिलाव एप्रिलमध्ये होण्याचे संकेत मिळत आहेत. यात बीड, माजलगाव आणि अंबाजोगाई तालुक्यातील वाळू पट्ट्यांचा समावेश आहे. हे लिलाव लवकर झाल्यास वाळू उपलब्ध होईल तसेच बांधकामांना वेग येईल असे मानले जात आहे.

ठळक मुद्देबीड, माजलगाव, अंबाजोगाईच्या पट्ट्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील पंधरा वाळूपट्ट्यांचे लिलाव एप्रिलमध्ये होण्याचे संकेत मिळत आहेत. यात बीड, माजलगाव आणि अंबाजोगाई तालुक्यातील वाळू पट्ट्यांचा समावेश आहे. हे लिलाव लवकर झाल्यास वाळू उपलब्ध होईल तसेच बांधकामांना वेग येईल असे मानले जात आहे.

चालु वर्षात जानेवारीमध्ये न्यायालयाच्या निर्देशानंतर वाळूघाट लिलाव प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. पर्यावरण अनुमतीबाबत न्यायालयाचे निर्देश होते. या संदर्भातील कार्यवाही जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली. त्यामुळे एप्रिलमध्ये या वाळू पट्ट्यांचा लिलावाचा मार्ग मोकळा झाल्याचे सुत्रांनी सांगितले. जिल्ह्यात माजलगाव तालुक्यात ४, बीड तालुक्यात ९ तर अंबाजोगाई तालुक्यातील एका पट्ट्याचा यात समावेश आहे.

वाळूपट्ट्यांचा लिलाव नसल्याने बांधकामांसाठी वाळू उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे वाळू साठवून ठेवणाऱ्या काही माफियांनी बेभाव वाळू विकली. मागील दीड महिन्यात मात्र वाळूअभावी अनेक ठिकाणचे बांधकाम ठप्प झाले आहेत. परिणामी या क्षेत्रातील व्यापारावर परिणाम झाला आहे. तर कामगारांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शासनाने वाळू उपलब्ध करावी या मागणीसाठी बीड, माजलगाव येथे मोर्चे काढण्यात आले. तर अंबाजोगाई येथे प्रशासनाला निवेदन देण्यात आले.दरम्यान १५ वाळू पट्ट्यांबाबत पर्यावरण अनुमतीची कार्यवाही झाल्यामुळे येत्या आठवड्यानंतर हालचालींना वेग येणार आहे.४७५ कारवाया, २ कोटी ३८ लाख रुपयांचा दंडअवैध उत्खनन प्रकरणी १ एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ पर्यंत ४७५ प्रकरणात कारवाई करण्यात आली. यात २ कोटी ३८ लाख ७५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच १० गुन्हे दाखल असून तिघांना अटक तर एकावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील यांनी सांगितले.बीड जिल्ह्यातील गोदावरीकाठच्या वाळूघाटाचे लिलाव दरवर्षी बदलतात. एक वर्ष बीड जिल्हा प्रशासन तर दुसºया वर्षी जालना जिल्हा प्रशासनाकडे त्याचे अधिकार असतात. या वर्षी जालना येथील जिल्हाधिकाºयांना या वाळू घाटांच्या लिलावासाठी प्राधिकृत करण्यात आल्याचे कळते.

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडMarathwadaमराठवाडाgodavariगोदावरी