शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातच आरोपीचा गळफास घेण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : खुनाच्या गुन्ह्यात बीड जिल्हा कारागृहात बंदी असलेल्या एका आरोपीने खिडकीच्या गजाला लुंगीच्या कपड्याने गळफास ...

ठळक मुद्देबीडमधील प्रकार : इतर कैदी ओरडल्याने पहारेकऱ्यांनी घेतली धाव

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : खुनाच्या गुन्ह्यात बीड जिल्हा कारागृहात बंदी असलेल्या एका आरोपीने खिडकीच्या गजाला लुंगीच्या कपड्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री १ वाजता घडली. इतर कैदी ओरडल्याने पहारेकºयांनी तात्काळ धाव घेत त्याला वाचविले. सध्या या आरोपीवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती ठणठणीत आहे.कालु उर्फ अरबाज खान फिरोज खान (३० रा.बुंदेलपुरा, बीड) असे आरोपीचे नाव आहे. १७ मे २०१७ रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास कारंजा परिसरात कालुसह त्याच्या इतर सात साथीदारांनी शहाबाज खान यांचा धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. याचा तपास करून दोषारोपपत्रही न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यानुसार या आरोपींना बीडच्या कारागृहात ठेवण्यात आलेले आहे. कालु हा बराक क्रमांक ७ मध्ये बंदी होता. रात्री १ वाजता त्याने आपल्या अंगावरील लुंगीच्या कपड्याच्या सहाय्याने खिडकीला गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र इतर कैदी ओरडले. त्यामुळे पहाºयावर असलेले संजिव चांदणे व वाल्मिक चिकणे यांनी तात्काळ बराक उघडून त्याला थांबविले. त्यानंतर तात्काळ त्याला जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर वॉर्ड क्रमांक ५ मध्ये उपचार सुरू असून प्रकृती ठणठणीत असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात येते. दरम्यान, पहाटे ५.३० वाजता चांदणे यांच्या फिर्यादीवरून कालुविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून कलम ३०९ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक फौजदार हरीश्चंद्र गिरी हे करीत आहेत.तर तो बचावला नसता?कालुला आपल्या बराकमधील सर्व कैदी झोपले असावेत, असा समज होता. त्यामुळे त्याने अंगावरील लुंगी काढली आणि खिडकीच्या गजाला बांधली. गळफास लावून लटकताच इतर कैद्यांनी आरडाओरडा केला.तात्काळ पहारेकºयांनी त्याला कैद्यांच्या मदतीने खाली उतरविले आणि जिल्हा रूग्णालयात दाखल केले. सुदैवाने काही कैदी जागे होते, त्यामुळे दुर्घटना मोठी टळली.अधीक्षक पवार ‘नॉट रिचेबल’यापूर्वीही कारागृहात अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. सोमवारी रात्री घडलेल्या घटनेला अनुसरून बाजू समजून घेण्यासाठी कारागृह अधीक्षक एम.एस.पवार यांना वारंवार भ्रमणध्वणीवरून संपर्क केला. मात्र त्यांचा भ्रमणध्वणी नॉटरिचेबल होता. त्यामुळे बाजू समजली नाही.

टॅग्स :BeedबीडjailतुरुंगCrime Newsगुन्हेगारी