शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जेवणाचे भांडण विकोपाला; विळ्याने केला वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:04 IST

पंधरा दिवसांपूर्वी एका प्रार्थना स्थळी झालेले भांडण विकोपाला जाऊन एकाने चौघांवर विळ्याच्या साह्याने प्राणघातक हल्ला चढविला.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : पंधरा दिवसांपूर्वी एका प्रार्थना स्थळी झालेले भांडण विकोपाला जाऊन एकाने चौघांवर विळ्याच्या साह्याने प्राणघातक हल्ला चढविला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा येथे शनिवारी सायंकाळी घडली. यात चौघे गंभीर जखमी झाले असून अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.पाटोदा येथील गणेश बळीराम सरवदे, शीतल उर्फ बाबासाहेब काशिनाथ सरवदे, जयपाल रामेश्वर सरवदे आणि प्रताप बळीराम सरवदे हे शनिवारी सायंकाळी ७.४५ वाजता गणेशच्या घरासमोर थांबले होते. यावेळी गावातील प्रमोद लिंबाजी कांबळे (वय ३६) हा तिथे आला. पंधरा दिवसापूर्वी एका प्रार्थनास्थळी जेवणाच्या वेळी झालेल्या भांडणाची कुरापत काढून प्रमोदने गणेशच्या गळ्यावर विळ्याने वार केला. परंतु, गणेशने वार चुकविला मात्र त्याच्या डोळ्याजवळ गंभीर जखम झाली. यावेळी गणेश सोबतच्या तिघांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रमोदने त्यांच्यावरही विळ्याने हल्ला चढविला. या हल्ल्यात चौघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी गणेशच्या फिर्यादीवरून प्रमोद कांबळे याच्यावर कलम ३०७, ३२४, ३२६, ५०६ अन्वये अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी प्रमोद कांबळे याला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास फौजदार भिकाने हे करत आहेत.दरम्यान, गणेश सरवदे आणि त्याच्या सोबतच्या तिघांनीच मला मारहाण केली अशी तक्रार प्रमोद कांबळे याने दिली आहे. त्याच्या तक्रारीवरून चौघांवरही कलम ३२४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पो.ह. भुसारी करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस