शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

दुपटीने व्याज मागून मारहाण करणाऱ्या सावकारासह तिघांवर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 23:44 IST

ठरलेल्या व्याजदरापेक्षा ऐनवेळी दुपटीने व्याज मागत सावकारासह तिघांनी एका तरुणास बेदम मारहाण केली आणि कुठेही वाच्यता न करण्यासाठी धमक्या दिल्या.

ठळक मुद्देमारहाण करीत जिवे मारण्याच्या धमक्या। शुक्रवारी पिंपळनेर ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा नोंद

बीड : ठरलेल्या व्याजदरापेक्षा ऐनवेळी दुपटीने व्याज मागत सावकारासह तिघांनी एका तरुणास बेदम मारहाण केली आणि कुठेही वाच्यता न करण्यासाठी धमक्या दिल्या. ही घटना बीड तालुक्यातील आंबेसावळीत सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी तिघांवर सावकारकीसह अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला आहे.आंबेसावळी येथील प्रशांत ऊर्फ सिद्धार्थ तात्याराम निसर्गंध (वय २७) या तरुणाने सात महिन्यापूर्वी काळेगाव येथील सावकार भारत रघुनाथ डोके याच्याकडून शेकडा ५ टक्के व्याजदराने ५ हजार रुपये घेतले होते. पंधरा दिवसापूर्वी प्रशांतने भारतला व्याजासह साडेसात हजार रुपये परत केले आणि हिशोबात काही रक्कम शिल्लक राहत असेल तर नंतर देतो, असे सांगितले. सोमवारी दुपारी ३.३० वाजता प्रशांत शेळ्या चारण्यासाठी स्वत:च्या शेतात घेऊन गेले असता सावकार भारत डोके आणि अर्जुन अंजाभाऊ बांडे हे दोघे दुचाकीवरून तिथे आले. प्रशांतचे चुलते देविदास निसर्गंध यांच्याजवळ जातीवाचक शिवीगाळ करत त्यांनी प्रशांतबद्दल विचारपूस केली आणि नंतर आंबेसावळीला निघून गेले. दुपारी ४ वाजता ते दोघे शेषेराव रुस्तम गुंदेकर (रा. आंबेसावळी) याला सोबत घेऊन पुन्हा प्रशांतच्या शेताकडे आले आणि तुला कर्जाने दिलेले पैसे मला १० टक्के व्याजाने आत्ताच पाहिजेत, असा तगादा त्यांनी प्रशांतकडे लावला. परंतु हिशोबाने पैसे दिले असून सध्या जवळ काहीच नसल्याचे सांगत प्रशांतने पैसे देण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे चिडलेल्या त्या तिघांनी प्रशांतला कुºहाडीचा दांडा आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या देविदास निसर्गंध यांनाही त्या तिघांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. मारहाणीत जखमी झालेल्या प्रशांतने जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले आणि त्यानंतर शुक्रवारी पिंपळनेर पोलिसांत तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपींवर सावकारकीसह अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत करत आहेत.कुºहाडीचा दांडा, लाथाबुक्क्यांनी मारहाणसोमवारी दुपारी प्रशांत शेळ्या चारण्यासाठी स्वत:च्या शेतात घेऊन गेले असता सावकार भारत डोके आणि अर्जुन बांडे हे दोघे दुचाकीवरुन तेथे आले आणि प्रशांतचे चुलतभाऊ देविदास यास जातीवाचक शिवीगाळ करीत प्रशांतची विचारपूस केली. दुपारी ४ वा. ते दोघे शेषेराव गुंदेकर याला सोबत घेऊन प्रशांतच्या शेताकडे आले आणि दिलेले पैसे १० टक्के व्याजाने आत्ताच पाहिजेत, असा तगादा लावला, यावर प्रशांतने असमर्थता दर्शविताच मारहाण सुरू केली.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी