शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
4
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
7
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
8
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
9
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
10
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
13
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
14
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
15
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
16
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
17
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
18
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
19
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
20
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत

लिव्ह इन रिलेशनशिपमधील महिलेच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमास वीस वर्षे कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 19:18 IST

या प्रकरणाची तक्रार अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात दाखल होती

अंबाजोगाई: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आरोपीने महिलेच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस दोषी ठरवत २० वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, अशी शिक्षा येथील  जिल्हा व सत्र न्यायाधीश  व्ही. के. मांडे यांनी सोमवारी ठोठावली. दत्ता शिवाजीराव जाधव ( रा. वाघाळवाडी, ता. अंबाजोगाई) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 

या प्रकरणाची हकीकत अशी की, फिर्यादी महिलेस पूर्वीच्या लग्नातून एक मुलगा व एक मुलगी असे अपत्य आहेत. तिची ओळख दत्ता जाधव याचे सोबत झाली. त्यादरम्यान तिचे प्रेम संबंध निर्माण झाले.  त्यानंतर १० ते १२ वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये मुलाबाळांसह महिला जाधव सोबत अंबाजोगाई येथे राहत होती. दिनांक १९/०४/२०२२ रोजी सकाळी ९.०० वाजेच्या सुमारास फिर्यादी भाजी विक्री करण्यासाठी बाजारात गेली होती. तेंव्हा फिर्यादीला दुपारी २.०० वा. च्या सुमारास शेजारी राहणाऱ्या महिलेच्या फोनवरून पिडीत अल्पवयीन मुलीने फोन केला व सांगितले की तू लवकर घरी ये असे म्हणून रडू लागली. तेव्हा फिर्यादीने विचारले असता, तिने सांगीतले की, मी व मोठा भाऊ घरी झोपलेलो असताना आरोपी दारु पिऊन आला व तो माझ्याजवळ येऊन झोपला , अश्लील चाळे करून अत्याचार केला.

फिर्यादी महिलेने या प्रकरणाची तक्रार अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात येथे दाखल केली. त्यानुसार आरोपी विरुद्ध कलम ३७६ (२) (1) भादवी सहकलम ४, ८, १२ पोस्को सहकलम ३ (१) (r) (s) (w), ३(२) (5) अ. जा. ज.अ.प्र. कायद्याअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.पोलिसांनी आरोपीस अटक केली.व त्याच्या विरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सदर प्रकरण सुनावणी साठी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश  व्ही. के. मांडे यांच्या न्यायालया समोर आले.

याप्रकरणात सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात पिडीता व तीची आई यांची साक्ष महत्वाची ठरली. या प्रकरणात सरकार पक्षाचा युक्तीवाद व साक्षपुरावा ग्राहय धरून  न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत विस वर्षे  सश्रम कारावास  व पाच हजार रूपये दंड ठोठावला.या प्रकरणी  सरकार पक्षातर्फे अॅड. शिवाजी व्यंकटराव मुंडे यांनी बाजू मांडली. त्यांना अँड अशोक व्ही. कुलकर्णी, व अॅड. विलास एस. लोखंडे यांनी  सहकार्य केले. कोर्ट पैरवी म्हणून म्हणून पो. उपनिरीक्षक  चंद्रकांत ठाकुर,  सी. व्ही. फ्रान्सिस, गोविंद कदम यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीBeedबीड