शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

Atal Bihari Vajpayee : परळीकरांच्या मनात अजूनही ताज्या आहेत अटलजींच्या सभेच्या आठवणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 20:01 IST

शहरात झालेल्या दोन्ही सभेच्या आठवणी परळीकरांच्या मनात आजही ताज्या आहेत. 

परळी (बीड ) : शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर जवळील जिल्हा परिषद हायस्कुल शाळेच्या मोकळ्या ग्राऊंडमध्ये आणिबाणीच्या आगोदर दुष्काळी परिषद माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली होती. यासोबतच १९८० मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या रेणापूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा सभेसाठी सुद्धा वाजपेयी परळीत आले होते. या दोन्ही सभेच्या आठवणी परळीकरांच्या मनात आजही ताज्या आहेत. 

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आज सायंकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने अवघे परळीत दुःखाचे वातावरण आहे. यानिमित्ताने परळीतील जुने भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांनी अटलजींच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. अटलजी पहिल्यांदा परळीत आले ते आणीबाणीच्या आधी दुष्काळ परिषदेसाठी. यानंतर ते आले गोपीनाथ मुंडे यांच्या रेणापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारार्थ. ही सभा झाली होती वैद्यनाथ महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात. सभेनंतर अटलजी यांनी व्यासपीठावरुन खाली येऊन गोपीनाथ मुंडे यांच्या आईचे दर्शन घेतले होते. अशी आठवण त्या सभेचे सुत्रसंचलन करणारे भाजप नेते दत्ताप्पा ईटके यांनी सांगितली. यासोबतच भाजप जेष्ट नेते विकास डुबे यांनी या सभेत अटलजींनी मराठीत भाषणाला सुरुवात केली होती अशी आठवण सांगितली. मंडीमे माल बहुत था ।मगर खरेंदीदार नही था । चाहे तो वोट खरेदी कर सकता था । लेकीन वोट खरेदी कर  ।सरकार नही बना ना था । अशा ओळींची आपल्या भाषणात अटलजींनी पेरणी केल्याची आठवण भाजयुमोचे तत्कालीन शहराध्यक्ष राजेंद्र ओझा यांनी सांगितले. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीDeathमृत्यूBeedबीड