शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय वादातून प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:15 IST

तालुक्यातील घोडका राजुरी येथे दोन गटात राजकीय वाद विकोपाला गेलेले आहेत. याच वादातून सोशल मीडियावर करण्यात आलेल्या कमेंटमुळे एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देघोडका राजुरीत युवक जखमी : सोशल मीडियावरील टिपणीवरून निवडणुकीआधीच धुमशान

बीड : तालुक्यातील घोडका राजुरी येथे दोन गटात राजकीय वाद विकोपाला गेलेले आहेत. याच वादातून सोशल मीडियावर करण्यात आलेल्या कमेंटमुळे एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. यातील जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.प्रवीण कैलास पवार (वय ३० वर्ष, रा. घोडका राजुरी ता.जी.बीड) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. घोडका राजुरी येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रवीण हा शिवसंग्राम पक्षाच्या वतीने असलेल्या गटातून उभा राहिला होता. दरम्यान या गावामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष पुरस्कृत गटाचा विजय झाला होता. यामध्ये प्रवीण हा निवडणूक जिंकत तो ग्रा.पं.सदस्य झाला असल्याची देखील माहिती आहे.मात्र, निवडणूक झाल्यापासून प्रवीण व घोडका राजूरीचे सरपंच तसेच इतर सदस्य यांच्यात अनेक वेळा वाद झाल्याची माहिती प्रवीण यांचे वडील कैलास यांनी दिली. तसेच याप्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालय, पिंपळनेर पोलीस ठाणे व मंत्रालयापर्यंत धमकी दिल्याप्रकरणी अर्ज केले आहेत. मात्र, कुठल्याही प्रकराची कारवाई करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.या वादाला राजकीय पार्श्वभूमी असून, याच संदर्भात काही दिवसापुर्वी प्रवीण यांच्याविरुध्द विरोधी पक्षाताली सदस्यांनी अक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यामुळे त्याचा जाब प्रवीण यांनी विचारला होता. त्याचे संभाषण देखील रेकॉर्ड असल्याचे कैलास यांनी सांगितले. दरम्यान शुक्रवारी पोळा सण होता, त्यामुळे गावात धामधूम होती. त्यावेळी घोडका राजूरी परिसरात असलेल्या एका मिलजवळ कैलास याला गज, तलवार व दगडाने सात ते आठ जणांनी मारहाण केली तसेच पिस्तूल दाखवल्याचे कैलास यांनी सांगितले. यामध्ये प्रवीण हा गंभीर जखमी झाला होता. त्याला बेशुद्ध अवस्थेत पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले होते. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर प्रवीण याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी रुग्णालयात येऊन कैलास पवार यांचा जबाब नोंदवला.यावेळी कैलास पवार यांनी सांगितल्यानूसार प्रवीण याच्यावर घोडका राजुरीचे सरपंच सचीन घोडके, पोपट घोडके, कल्याण पवार, मसु घोडके, अमोर वापर, बंटी पवार, बंटी जाधव व इतर संतोष नामक एका व्यक्तींनी मारहाण केल्याचे नमूद केले आहे. मात्र, याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPoliticsराजकारण