शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असतानाच आष्टीच्या तरुणाचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 17:25 IST

सुरक्षततेसाठी लावण्यात आलेल्या जाळीमुळे तरुणाचा जीव वाचला.

आष्टी (बीड) : जिल्ह्यातील आष्टी येथील बापू नारायण मोकाशे या तरुणाने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षततेसाठी लावण्यात आलेल्या जाळीमुळे सदर तरुणाचा जीव वाचला. दरम्यान, हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आष्टी तालुक्यातील पारगांव जोगेश्वरी येथील मुंजाबा वस्तीवर बापू नारायण मोकाशे एकटा राहतो. बापूचे शिक्षण इंजिनीअर डिप्लोमापर्यंत झाले आहे.  त्याने काहीकाळ पुणे येथील खासगी कंपनीमध्ये नोकरी केली. त्यानंतर गावी येऊन शेती करू लागला. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय देखील त्याने सुरु केला होता. मध्येच जामखेड येथील इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक म्हणून नोकरी केली. तेथील नोकरी सोडत टाकळी डोकेश्वर, नगर मध्ये एक दोन वर्षे वास्तव्यास होता. त्यानंतर गावी राहायला आला. गेल्या दोन तीन वर्षांपासून बापू एकटाच राहत असे. पत्नी दोन मुलांसह माहेरी राहते. गेल्या चार पाच दिवसांपासून तो गावात दिसला नव्हता. 

दरम्यान, आज दुपारी त्याने मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. यामागे कोणते कारण असावे, याबाबत अद्याप उलगडा झाला नाही. अहमदनगर येथे काही वर्षांपूर्वी राहत होता. त्यानंतर त्याची मानसिक स्थिती बिघडली असल्याची माहिती पारगाव येथील ग्रामस्थांनी दिली आहे. मनोविकारातून त्याने हे कृत्य केले असावे, अशी चर्चा आहे.

प्रेयसीला न्याय द्यावा पोलिसांनी या तरूणाला ताब्यात घेतले असून उपचारासाठी त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला रूग्णवाहिकेतून रूग्णालयात नेले जात असताना आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे कारण विचारण्यात आले असता आपल्या प्रेयसीवर बलात्कार झाला असून न्याय मिळत नसल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.

टॅग्स :BeedबीडMantralayaमंत्रालय