शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या वृत्तानंतर आष्टी पोलिसांना जाग; पीडितेसह कुटूंबियांना दिले संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 16:39 IST

आरोपीला तात्काळ अटक न केल्यास कारवाईची तंबीही एसपींनी दिली आहे.

ठळक मुद्देएसपींचे आष्टी पोलिसांना आदेश आरोपी अटक करा अन्यथा कारवाई

बीड : अत्याचार प्रकरणातील आरोपीने आष्टी पोलिसांना चकवा देत ठाण्यातून पलायन केले होते. या आरोपीपासून पीडिता व तिच्या कुटूंबियांना भिती होती. याबाबत संरक्षणाची मागणी करूनही आष्टी पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर लोकमतने हा प्रकार समोर आणल्यानंतर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी आष्टीच्या पोलीस निरीक्षकांची चांगलीच कानउघडणी केली. सोमवारी पीडितेसह कुटूंबियांना संरक्षण देण्यात आले. तसेच आरोपीला तात्काळ अटक न केल्यास कारवाईची तंबीही एसपींनी दिली आहे.

आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथे एका १९ वर्षीय तरूणीला चाकुचा धाक दाखवून गावातीलच सुनिल डुकरे याने अत्याचार केला होता. ही घटना ३ जून रोजी घडली होती. त्यानंतर आष्टी पोलिसांनी सुनिलला चौकशीसाठी म्हणून ठाण्यात आणले. येथे त्याने आष्टी पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले होते. त्यामुळे त्याच्यापासून अथवा त्याच्या जिवाला धोका असण्याची भिती व्यक्त केली जात होती. एवढ्यात पीडितेच्या भावाने आष्टी पोलीस निरीक्षकांकडे संरक्षणाची मागणी केली होती. मात्र, आष्टी पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. 

हाच धागा पकडून लोकमतने सर्व बाजू समजून घेत वृत्त प्रकाशित करून हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आणला. त्यानंतर सोमवारी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी आष्टीचे पोलीस निरीक्षक माधव सुर्यंवशी यांची चांगलीच कानउघडणी केली. तपासात हलगर्जी करू नये, तसेच पीडितेला संरक्षण देण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे पीडितेच्या घराजवळ एक कर्मचारी कायमस्वरूपी नियूक्त करण्यात आला आहे.

अपर अधीक्षकांनीही घेतले फैलावरआरोपीने पलायन केलेले असतानाही आष्टी पोलिसांनी ही बाब अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्यापासून लपविली होती. हा प्रकार समजताच कबाडे यांनी उपअधीक्षक विजय लगारे आणि पोनि सुर्यंवशी यांना चांगलेच फैलावर घेतले होते. त्यानंतर हे सर्व प्रकार समोर आला.

वय चुकल्याचा केला खुलासाफिर्यादीत पीडितेचे वय १७ वर्षे व जबाबात १९ होते. हा प्रकार सीसीटीएनएसमध्ये अपलोड करताना चुक झाल्याचा खुलासा पोनि माधव सुर्यवंशी यांनी अपर अधीक्षक विजय कबाडे यांच्याकडे केला आहे. यासंदर्भात त्यांनी लेखी पत्रही दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

पीडिता व कुटूंबियांना सरंक्षण दिले आहे. तसेच आरोपीलाही तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत. तपासात हलगर्जी केल्यास चौकशी करून कारवाई करू.- जी.श्रीधर, पोलीस अधीक्षक, बीड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारBeedबीडPoliceपोलिस