शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी हादरले; दरोडेखाेरानंतर पैशाच्या वादातून सुटीवर आलेल्या सैनिकाचा खून

By सोमनाथ खताळ | Updated: December 9, 2023 20:00 IST

मारहाण करणाऱ्या भावाला बेड्या : १५ दिवसांपूर्वीच आला होता सुट्टीवर

- नितीन कांबळेकडा (जि.बीड) : दोन दिवसांपूर्वीच एका अट्टल दरोडेखोराचा भोसले व काळे गँगने चाकूने भोसकून व दगडाने ठेचून खून केला होता. यातील आरोपी अटक होत नाहीत तोच पुन्हा पैशाच्या वादावरून दोन सख्या भावांत वाद झाला. यात सैनिक असलेल्या मोठ्या भावाला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास आष्टी तालुक्यातील वाघळूज येथे उघडकीस आली. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. एका दराेडेखोरानंतर तिसऱ्याच दिवशी सैनिकाचा खून झाल्याने आष्टी हादरले आहे.

प्रवीण विनायक पवार (वय ३९ रा.वाघळूज ता.आष्टी) असे मयताचे नाव आहे. प्रवीण हे झारखंड येथे सीआरपीएफ मध्ये नोकरीला असून मागील पंधरा दिवसांपासून सुट्टीवर गावी आले होते. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास प्रवीण व त्यांचा लहान भाऊ विनोद यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. यात प्रवीणला बेदम मारहाण करण्यात आली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना तात्काळ अहमदनगर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतू मारहाणीत जखम झाल्याने अतिरक्तस्त्राव झाल्याने शनिवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिसांनी रूग्णालयात धाव घेतली. तसेच घटनास्थळाचाही पंचनामा केला. याप्रकरणी प्रवीण यांच्या पत्नी सीमा पवार यांच्या फिर्यादीवरून सासू झुंबरबाई पवार, सासरे विनायक पवार, भावजयी सोनाली पवार, दीर विनोद पवार यांच्या विरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विनोद पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास उपनिरीक्षक आदिनाथ भडके करीत आहेत.

दरोडेखाेराचा खून, सर्व गुन्हेगार फरारआष्टी तालुक्यातील दैठणा परिसरात एवन हैवान काळे (रा.खांडवी ता.आष्टी) या अट्टल दरोडेखोराचा त्याच्याच सहा साथीदारांनी दगडाने ठेचून व चाकूने भाेसकून खून केला होता. याप्रकरणात भोसले व काळे गँगमधील सहा जनांविराेधात आष्टी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. याच्या तपासासाठी दोन पथकेही नियूक्त केली होती. परंतू शनिवारी सायंकाळपर्यंत यातील एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नव्हती. फरार सर्वच आरोपी अट्टल दरोडेखाेर आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड