शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

कुबडीऐवजी आता ताठपणे चालत शाळेत जाणार अशोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:50 IST

कुबड्यांचा आधार घेत गावापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावरील नेकनूरच्या शाळेत जात होता. बीड येथील दिव्यांग शिबिरात आल्यानंतर त्याला कृत्रिम पाय मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जन्मत:च पायाची चुंबळ झालेली. एक पाय चांगला, उजव्या पायाचा पंजा गुडघ्याबरोबर मागच्या बाजूला. शरीर तर वाढत होते. तशाच अवस्थेत शाळेत जाणारा अशोक नंतर काठीचा आधार घेऊन चालत होता. नंतर कुबड्यांचा आधार घेत गावापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावरील नेकनूरच्या शाळेत जात होता. बीड येथील दिव्यांग शिबिरात आल्यानंतर त्याला कृत्रिम पाय मिळाला. आता तो कुबड्यांविना चालत शाळेत जाणार आहे. डाव्याच्या बरोबरीचा उजवा कृत्रिम पाय जोडल्यानंतर चालताना त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.वाघेबाभूळगाव (ता.केज) येथील अशोक बंडू पवार या शाळकरी मुलाची ही कहाणी. लहानपणीच वडील घर सोडून गेले. अशोक व दोन मुलांचा सांभाळ आई सिंधूबाईने केला. प्रसंगी अर्ध्या कोयत्याची मजुरी उचलीत ऊस तोडणीलाही गेल्या. अशोकला शिकण्याची ओढ होती. अपंगत्वामुळे शाळकरी मुले, मित्र मस्करी करीत पण नशिबाच्या थट्टेपुढे तो खचला नाही. पाय बरा करण्याचे आव्हान या कुटुंबापुढे होते. औंध, पुणे व इतर शहरात दाखवले. गुडघ्या खालचा भाग कापावा लागेल, पुढच्या सर्जरीसाठी व उपचारासाठी सत्तर हजारावर खर्च लागणार होता. मात्र हे करायला कुटुंबाची हिम्मत नव्हती.बीडमध्ये ८ मार्चपासून भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती आणि भारतीय साधारण विमा निगम च्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या शिबिरात अशोक आला. डॉ. नारायणदास व्यास यांनी पाहिले. ओमप्रकाश वर्मा नावाच्या सहायकाने मोजमाप करुन अशोकचा पाय कसा बनवायचा याचे निरीक्षण केले. तीन तासात मोजमापानुसार अ‍ॅबोनी फूट तयार केले. कॅलिपर लॉक, गुडघ्यासाठी वाटी, गुडघ्यापासून पंजापर्यंत फायबर व जयपूर फूटचा वापर यात केला. अपंगत्व असलेल्या पायाला जोडला आणि क्षणभरात अशोक विनाकुबडी कुठलाही आधार न घेता उभा राहिला. नंतर व्यास स्वत: त्याच्या सोबत २०-२५ फूट अंतरापर्यंत चालले, नंतर अशोक स्वत:च चालू लागला. वयाच्या १४ व्या वर्षी दुसरा पाय मिळाल्याने खूप आनंद झालाय. आता मी गावापासून नेकनूरच्या जि. प. शाळेपर्यंत ताठपणे पायांवर जाणार असल्याचे सांगत शिबीर आयोजकांना त्याने धन्यवाद दिले.

टॅग्स :SocialसामाजिकStudentविद्यार्थी