शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
4
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
5
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
6
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
7
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
8
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
9
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
10
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
11
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
12
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
13
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
14
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
15
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
16
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
17
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
18
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
19
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?

परळीतील राख माफियांना लगाम! आता केवळ पैसे भरलेल्या एजन्सीच करणार राखेचा उपसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 19:40 IST

शुल्क भरा आणि राख वापरा आदेशाची अंमलबजावणी सुरू; पोलीस बंदोबस्तात बंधाऱ्यात सोडल्या पोकलेन मशीन

- संजय खाकरे परळी ( बीड) : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महाजनको ) अंतर्गत असलेल्या परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या दाऊतपुर येथील बंधाऱ्यातून राख उचण्यात मोठा बदल करण्यात आला आहे. आता शुल्क भरून अधिकृत पॉंड राख उचलण्यास पात्र 16 निविदाधारक एजन्सीना मंजुरी देण्यात आली आहे. दोन एप्रिल बुधवारी २१ पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या बंदोबस्तामध्ये आणि परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या ३० अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राख उपसा करण्यासाठी आवश्यक असणारी पोकलेन मशीन यंत्रणा बुधवारी बंधाऱ्यात निविदाधारक एजन्सी चालकाकडून सोडण्यात आली. 

गुरुवारपासून प्रत्यक्षात राख उपसा सुरू होणार आहे. गेल्या तीन महिन्यापासून दाऊतपुर येथील राख बंधाऱ्यातील राख उपसा महाजनकोने बंद केला होता. गेले काही वर्ष महाजनकोला रॉयल्टी न देताच अनधिकृतपण काही जण राख उपसा करीत होते. दररोज शंभर हायवा टिप्पर भरून राख उचलल्या जात होती. त्यामुळे महाजनकोला आर्थिक फटका होत होता. ही राख वीटभट्टी धारकांना विक्री केली जात होती. याप्रकरणी ओरड झाल्यानंतर महाजकोनी एक जानेवारी 2025 पासून अनाधिकृत होणारा राख उपसा बंद केला होता. यानंतर दाऊतपुर राखण नियंत्रण कृती समितीची स्थापना होऊन शंभर टक्के राख कोटा प्रकल्पग्रस्तांना देण्याची मागणी केली होती. पण प्रत्यक्षात प्रकल्पग्रस्त बाधित गावच्या व्यक्तींसाठी 20 टक्के राख उचलण्यास मान्यता आहे. 

पोलिस बंदोबस्तात राख उचलणारदरम्यान, गेल्या दीड वर्षांपूर्वी राख उपसा करण्यासंदर्भात निघालेल्या निविदा सूचना मध्ये 16 जण पात्र झाले होते त्यासाठी रक्कमही भरण्यात आली होती. या निविदाधारकांना आता शुल्क भरून व गेट पास घेऊन राख उचलण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यादृष्टीने बुधवारी थर्मल प्रशासनाने पावले उचलले आहेत. बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून थर्मलचे अधिकारी व परळी ग्रामीणचे पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. थर्मल प्रकल्पग्रस्त दाऊतपुर व परिसरातील 150 जणांचे अर्ज कमी दराने राख उचलण्यास परवानगी द्यावी यासाठी थर्मल प्रशासनाकडे आलेले आहेत. या संदर्भातील निर्णय अद्याप प्रशासनाने घेतलेला नाही अशी माहिती थर्मलच्या सूत्राकडून कळाली आहे. 

राखेस मोठी मागणीपरळी तालुक्यातील दाऊतपुर, दादाहरी वडगाव शिवारात महाजनकोचे नवीन औष्णिक विद्युत केंद्र असून या नवीन विद्युत केंद्रामध्ये 250 मेगावॅट क्षमतेचे तीन संच चालू आहेत. या तीन संचाची एकूण 750 मेगावॅट एवढी विजेची स्थापित क्षमता आहे. वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या दगडी कोळशापासून तयार झालेली पॉंड राख ही दाऊतपुर येथील राख बंधाऱ्यात सोडण्यात येते. तर फ्लाय ऐश (राख) ही बंकर द्वारे उचलण्यात येते फ्लाय राखेचे अधिकृत टेंडर यापूर्वीच निघालेले आहे. पॉंड राख ही बीड, लातूर , परभणी जिल्ह्यातील वीट भट्टीसाठी वापरले जाते तर फ्लाय राख पुणे ,मुंबई येथे सिमेंट व रस्ते बांधकामासाठी पुरवठा केला जातो.

टॅग्स :BeedबीडBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या