शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये तब्बल १२८१ जणांकडे शस्त्र परवाने; २४५ जणांवर गुन्हे दाखल, तरीही कंबरेला बंदूक

By सोमनाथ खताळ | Updated: December 26, 2024 18:21 IST

एसपींनी माहिती दिल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांकडून काहीच कारवाई नाही

बीड : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी परभणी, अमरावतीचे उदाहरणे देत सर्वात जास्त बीडमध्ये शस्त्र परवाने दिल्याचा उल्लेख केला. त्या आधीच तत्कालीन पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त १६ गुन्हे दाखल असलेल्या २४५ जणांची माहिती जिल्हाधिकारी यांना ऑक्टोबरमध्ये पाठवली होती. आता डिसेंबर संपत आला, तरी जिल्हाधिकारी यांच्याकडून यावर काहीच कारवाई झालेली नाही. त्यामुळेच आज हे लोक बिनधास्त बंदूक लावून फिरत आहेत. त्यातच काही जण हवेत गोळीबार करत असल्याचेही परळीतील घटनेवरून उघड झाले आहे. बीडमध्ये नेमके हे काय चालले आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात सद्य:स्थितीत १ हजार २८१ जणांकडे शस्त्र परवाना आहे. प्रत्येक परवाना देताना पोलिसांकडून संबंधित अर्जदाराची शहानिशा केली जाते. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याची माहिती घेतली जाते; परंतु मागील काही वर्षांत पोलिसांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केले. त्यामुळेच जिल्ह्यात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि ज्यांनी परवाना घेतल्यावरही गुन्हे करणे सुरूच ठेवले आहेत, अशांकडेही शस्त्र परवाना ठेवला आहे. बीडमध्ये पाेलिस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यावर अविनाश बारगळ यांनी गुन्हे दाखल असलेल्या सर्वांची यादी बनवली. त्याप्रमाणे जिल्हा विशेष शाखेकडून गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे ऑक्टाेबरमध्येच पाठवला. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी अद्यापही यावर काहीच कारवाई केलेली नाही. ही फाईल सध्या जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात धूळ खात पडून असल्याचे सांगण्यात आले.

टोळीत कोणाचा सहभाग?बंदूक परवाना देण्यासाठी राजकीय, पोलिस व जिल्हाधिकारी कार्यालयातीलच काही लोक धावपळ करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ठरावीक रक्कम दिली की टक्केवारीने वाटप करून अशाप्रकारचे परवाने दिले जातात. ही टोळी सक्रिय असल्यानेच जिल्ह्यात शस्त्र परवान्यांची संख्या एक हजारांवर गेली आहे. विशेष म्हणजे, गुन्हे दाखल असतानाही त्यांना परवाना दिला जात आहे.

बारगळ पॅटर्न राबविण्याची गरजअविनाश बारगळ यांनी बंदूक परवाना रद्दसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावा केला होता. यासाठी एक कर्मचारीही नियुक्त करणार होते. तसेच, जिल्हाधिकारी प्रशिक्षण घेऊन येताच त्यांच्यासोबत या विषयावर बैठकही होणार होती. परंतु, त्याआधीच बारगळ यांची बदली झाली. आता नवीन पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनीही अशाच प्रकारचा पॅटर्न राबविण्याची गरज आहे.

अधिवेशनातही गाजला मुद्दाबीड जिल्ह्यातील शस्त्र परवान्यांचा मुद्दा भाजपचे आष्टीचे आ. सुरेश धस यांनी उपस्थित केला. कोणीही उठतंय अन् बंदूक लावून फिरतंय. उठसूठ हवेत गोळीबार करत असल्याचा आरोप केला होता. हे शस्त्र परवाने कोणाच्या शिफारशीवरून देण्यात आले, याची चौकशी करण्याची मागणीही आ. धस यांनी केली आहे.

परळीत हवेत गोळीबारपरळीत कैलास बाबासाहेब फड (रा. बँक कॉलनी, परळी) याने एका कार्यक्रमाच्या वेळी विनाकारण हवेत फायर केले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परळी शहर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. असेच प्रकार इतर ठिकाणीही घडलेले आहेत, परंतु त्याचे व्हिडीओ आणि लोक भीतीपोटी पुढे येत नसल्याने हे प्रकरण तेथेच दबल्याची चर्चा आहे.

२९५ प्रस्ताव नाकारलेजिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्याआधी पोलिसांकडून त्याची खातरजमा केली होती. हे सर्व करून पाठविलेले २९५ प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातून नाकारण्यात आले आहेत. त्यामुळे पाेलिसांवरही संशय व्यक्त होत आहे. तर दुसऱ्या बाजूला २४५ प्रस्तावांवर निर्णय घेतला जात नसल्याने महसूल विभागही संशयाच्या भोवऱ्यात आहे.

अशी आहे आकडेवारीएकूण शस्त्र परवाने - १२८१रद्दचे प्रस्ताव पाठविले - २४५१ गुन्हा असलेले - १५५२ गुन्हे असलेले ४०३ गुन्हे असलेले २०४ गुन्हे असलेले १७५ गुन्हे असलेले ३६ गुन्हे असलेले ५९ गुन्हे असलेला ११० गुन्हे असलेला ११२ गुन्हे असलेला ११४ गुन्हे असलेला ११६ गुन्हे असलेला १

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड