शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

सोने काढून देण्याच्या बहाण्याने लुबाडणाऱ्या महिलेस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:32 IST

महिलेसह इतर दोन महिलांविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : तुझ्या घरात २२ किलो सोने आहे ते काढून देते, असे सांगून सोने व रोख रक्कम लुबाडणा-या बीड शहरातील तेलगाव नाका परिसरात राहणा-या शेख नाजिया बेगम शेख पाशा पोलिसांनी अटक केली आहे. त्या महिलेसह इतर दोन महिलांविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.बीड तालुक्यातील कामखेडा येथील रहिवासी मन्नाबी अर्फ खालेदाबी सिराज शेख (वय ६० वर्ष) आहेत. त्यांचा सर्वात लहान मुलगा शेख आसेफ शेख सिराज याला मागील दीड वर्षापासून दारुचे व्यसन लागले आहे. तसेच भांडण देखील करत होता. त्याची दारू सुटावी यासाठी दीड महिन्यापुर्वी फिर्यादी मन्नाबी शेख या त्यांच्या शेजारी राहणा-या इर्शाद शेख व साजेदाबी शेख ( राहणार कामखेडा) यांच्या माहितीवरुन बीड येथील तेलगाव नाका परिसरात मोमीनपुरा येथे राहत असलेल्या जादूटोणा कराणा-या शेख नाजिया बेगम शेख पाशा या महिलेच्या घरी गेल्या. नाजिया शेख ही दारु सोडवण्याचे औषध देते असे मन्नाबी शेख यांना त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगीतले होते त्यामुळे त्यांचा विश्वास बसला.ज्यावेळी फिर्यादी मन्नाबी शेख या भोंदू शेख नाजिया बेगम शेख हिच्या घरी गेल्या, त्यावेळी मन्नाबी यांच्या भोवती भोंदू शेख नाजिया हिने कुंकु,भावल्या व टाचणीचे वर्तुळ केले व मन्नाबी यांना त्यामध्ये बसवले व काही मंत्र मोठमोठ्याने पठण करु लागली. त्यानंतर नाजीया म्हणाली, तुमच्या घरात जमिनिमध्ये २२ किलो सोने पुरलेले आहे. त्या सोन्यावर वाईट आत्मा बसलेला आहे. तो दूर करण्यासाठी सोने व पैसे घेऊन ये असे मन्नाबी यांना सांगण्यात आले. त्याप्रमाणे मन्नाबी यांनी स्वत:सह दोन सुनांच्या अंगावरील अडीच तोळे सोनं व काही रोख रक्कम घेऊन मन्नाबी व त्यांच्या शेजारी व आरोपी साजेदाबी शेख व इशादाबी शेख अशा मिळून त्याच ठिकाणी घटनेच्या दोन दिवसानंतर गेल्या. घरातील गुप्त धन सोने काढून देण्यासाठी सोने व रोख रक्कम मिळून ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल भोंदू नाजिया शेखच्या हातात दिला होता. त्यानंतर देखील नाजीया शेख हीने पैशाची मागणी केली होती. मात्र, पैसे नसल्याने मन्नाबी यांनी नातेवाईक साजेद शेख मुन्सी, शेख मुन्सी बाबरखान, शेख आासेफ शेख करिम व शेख सिद्दीक शेख हकीम, शारदा अशोक नेवडे यांच्याकडून देखील सोने व रोख रक्कम घेऊन दिली त्यानंतर नाजिया हिने लिंबू, काळी भाऊली, कुंकु, हळद दिली, मात्र पूर्ण रक्कम न मिळाल्यामुळे भोंदू नाजीया शेख हिने गुप्त धन काढून देण्यास नकार दिला.२२ किलो सोन्याच्या लालचेपोटी जवळ असलेले पैसे व सोने देखील गेले यामुळे निराशा आली होती त्यामुळे फिर्यादी महिलेने विषारी द्रव्य घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरुन शेख नाजिया शेख पाशा, इशादाबी शेख, सामेदाबी शेख बशीर (दोघी रा. कामखेडा) यांच्या विरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात जादूटोणा कायद्यानूसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यापैकी भोंदू शेख नाजिया शेख पाशा हिला अटक करण्यात आली असून इतर दोन आरोपी फरार आहेत. याचा तपास पो.नी.सुजीत बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक लक्ष्मीकांत माने करत आहेत.तुला मुंगी, माशी बनवेन... !ही घटना दीड महिन्यापुर्वी घडली आहे, आपण फसलो असून लालचेपोटी जवळचे सोनं व पैसे देखील गेल्याचे कळल्यानंतर वेळोवेळी फिर्यादी मन्नाबी शेख यांनी भोंदू शेख नाजीया बेगम शेख पैशाची मागणी केली मात्र, तिने देण्यास टाळाटाळ केली.कोणाला काही सांगितले तर जादूटोणा करुन तुला मुंगी, माशी बनवेल तसेच दोन्ही मुलांना जिवे मारील अशी धमकी देत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.अनेकांना घातला गंडागुप्त धन काढून देते म्हणत बीड शहातील अनेक भागामध्ये या महिलेने अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याची सूत्रांची माहिती आहे. याचा अधिक तपास बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी करत असून तपासात सर्व काही उघड होईल.आत्मा शांतीसाठी मागितला ४० बोकडे, एक हरणाचा बळीजमिनीखालील सोन्यावर आत्मा बसलेला असून त्यांच्याशी माझे बोलने झाले आहे. तो शांत करण्यासाठी ४० बोकडे, व १ हरणाचा बळी द्यावा लागेल असे शेख नाजिया शेख पाशा हिने मन्नाबी शेख यांना सांगितले होते. हे ऐकून मन्नाबी अवाक झाल्या होत्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीWomenमहिलाArrestअटक