शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पेठबीड पोलिसांची मनमानी, आरोग्य वर्धिनी केंद्रातील चोरीची तक्रार घेण्यास टाळाटाळ

By सोमनाथ खताळ | Updated: April 25, 2023 15:32 IST

आरोग्य विभागाचे डॉक्टर, कर्मचारी ठाण्यात ताटकळले

बीड : १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू केले जात आहेत. याच केंद्रातील फर्निचर व इतर साहित्य असे जवळपास दोन लाख रूपयांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. याची तक्रार देण्यासाठी आरोग्य विभागाचे डॉक्टर, कर्मचारी सकाळी १० वाजेपासून पेठबीड ठाण्यात बसून आहेत. परंतू वेगवेगळे कारणे सांगून त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत तक्रार घेतली नसल्याने पेठबीड पोलिसांविरोधात रोष व्यक्त होत आहे.

बीड शहरात सहा ठिकाणी आरोग्य वर्धिनी केंद्र तर एका ठिकाणी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला जाणार आहे. १ मे पासून या सर्व ठिकाणी रूग्णसेवा मिळणार आहे. त्यामुळे किरायाने घेतलेल्या जागेत फर्निचर व इतर आवश्यक साहित्य ठेवण्यात आले होते. तेलगाव नाका येथील आरोग्य वर्धिनी केंद्रातील जवळपास दोन लाख रूपयांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. दरवाजाचा कोंडा तोडून त्यांनी आत प्रवेश केल्याचे सांगण्यात आले. याचीच तक्रार देण्यासाठी आरोग्य विभागाचे डॉक्टर, कर्मचारी पेठबीड पेालिस ठाण्यात गेले होते. परंतू तक्रार घेणे तर दुरच परंतू यांनाच उलट चौकशा करण्यात आल्या. शिवाय मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत वेगवेगळे कारणे सांगून तक्रार घेतली नाही. शासनाच्याच लोकांना अशाप्रकारे वागणूक दिली जात असेल तर सामान्यांना कशी सेवा मिळत असेल? असा प्रश्न आहे. पोलिसांच्या अशा वागणुकीमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

माहिती घेतोमी सध्या औरंगाबादला आहे. फिर्याद दाखल करून घेण्यासाठी ठाणे प्रमुख लागतात, असे काही नाही. मी नेमकी माहिती घेतो.रामचंद्र पवार, सहायक पोलिस निरीक्षक पेठबीड

तक्रार घेतली नाही तेलगाव नाका परिसरातील आरोग्य वर्धिनी केंद्रात चोरी झाली आहे. जवळपास २ लाख रूपयांचे साहित्य चोरी गेले आहे. याची तक्रार देण्यासाठी आमचे अधिकारी, कर्मचारी पेठबीड पोलिस ठाण्यात गेले होते. परंतू अद्याप ती घेतलेली नाही. दुपारनंतर या, असा सल्ला दिल्याचे पथकाने मला सांगितले.- डॉ.नरेश कासट, तालुका आरोग्य अधिकारी बीड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड