शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

राज्यात ७२७ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियूक्ती आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 14:48 IST

पीएचसीला ४६१ तर रूग्णालयात २६६ लोकांचा समावेश

ठळक मुद्देपदोन्नतीवरही सकारात्मक चर्चा

बीड : महाराष्ट्रात आरोग्य विभागाच्या रिक्त जागांचा प्रश्न ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून निदर्शनास आणला होता. यावर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. सुरूवातीला मुलाखती आणि आता ७२७ वैद्यकीय अधिकाऱ्यांना (गट अ) नियूक्तीचे आदेश दिले आहेत. पैकी काही अधिकारी रूजूही झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात ४६१ तर इतर रूग्णालयांमध्ये २६६ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मराठवाड्याला २९२ एमओ डॉक्टर मिळाले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागात शिपायापासून ते संचालकांपर्यंतची पदे रिक्त असल्याने यंत्रणाच ‘आजारी’ पडली होती. यामुळे शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचत नव्हत्या. तसेच रूग्णांना आरोग्य सेवाही तत्पर मिळत नसल्याची ओरड होत होती. हाच धागा पकडून ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून राज्यातील रिक्त पदांचा प्रश्न निदर्शनास आणून दिला. त्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आणि तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या ८७७ जागांसाठी मुलाखती घेतल्या. याचे मुंबईत समुपदेशन केले. दोन टप्प्यात समुपदेशन झाले असून आतापर्यंत ७२७ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियूक्ती आदेश दिले आहेत.

मिळालेले तज्ज्ञ व एमबीबीएसचा आकडाएमबीबीएसच्या ४६५ डॉक्टरांसह भिषक १६, भूलतज्ज्ञ ३०, स्त्रीरोग तज्ज्ञ ६३, बालरोग तज्ज्ञ ६२, क्ष-किरण शास्त्रज्ञ ७, मानसोपचार तज्ज्ञ १०, पीएसएम २१, शल्य चिकित्सक ७, अस्थिव्यंग तज्ज्ञ २१, शरिरविकृती शास्त्रज्ञ ४, नाक-कान-घसा ४, त्वचारोग तज्ज्ञ २, रक्त संक्रमण अधिकारी १, नेत्र रोग १४ अशा तज्ज्ञांच्या जागा भरण्यात आलेल्या आहेत. 

कोणत्या जिल्ह्यासाठी किती डॉक्टरराज्यात ७२७ मध्ये ठाणे ३९, पालघर १५, रायगड २५, कोल्हापूर २२, सिंधुदुर्ग ६, रत्नागिरी ११, सांगली १६, पुणे ४४, सोलापूर २५, सातारा १४, नाशिक ३१, नंदुरबार २१, जळगाव ११, धुळे १९, अहमदनगर २६, औरंगाबाद ३३, जालना २९, परभणी २९, हिंगोली २१, लातूर ३९, उस्मानाबाद २४, बीड ७०, नांदेड ४७, अकोला १३, अमरावती ७, यवतमाळ ८, वाशिम १२, बुलढाणा २६, नागपूर २०, भंडारा ६, वर्धा २, गोंदिया ८, चंद्रपूर ५, गडचिरोली ३ असे अधिकारी मिळाले आहेत. 

पदोन्नतीवरही सकारात्मक चर्चाआरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या प्रश्नावरही लोकमतने आवाज उठविला होता. यावर तीन दिवसांपूर्वी प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये पदोन्नतीच्या मुद्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकपर्यंतच्या डॉक्टरांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजते. पदोन्नतीची प्रक्रिया सुरू झाल्याने अधिकाऱ्यांमध्ये समाधान आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागला आहे. इतर जागाही भराव्यात. नियूक्ती आदेश मिळालेली काही अधिकारी अद्यापही रूजू झालेले नाहीत. ते रूजू झाल्यावर कामात काही प्रमाणात नक्कीच सुसूत्रता येईल. - डॉ.राधाकृष्ण पवार ( अध्यक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटना महाराष्ट्र )

टॅग्स :doctorडॉक्टरState Governmentराज्य सरकारhospitalहॉस्पिटल