शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची घोषणा केवळ जीआर काढण्यापुरतीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 23:53 IST

सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी ही घोषणा केवळ जी.आर. काढण्यापुरती कागदावरच राहिली असून, प्रत्यक्षात उपाययोजना मात्र शून्यच असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे

ठळक मुद्देधनंजय मुंडे : अंबाजोगाई, परळी तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी ही घोषणा केवळ जी.आर. काढण्यापुरती कागदावरच राहिली असून, प्रत्यक्षात उपाययोजना मात्र शून्यच असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. सरकारने सर्वाधिक दुष्काळग्रस्त असलेल्या बीड जिल्ह्याला तर वाऱ्यावरच सोडले आहे का काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कदाचित इथल्या पालकमंत्री विदेशात असल्याने मुख्यमंत्री शेजारच्या जिल्ह्यात आढावा बैठका घेतात मात्र बीड जिल्ह्याला टाळत असावेत असा टोलाही मुंडे यांनी लगावला.जिल्ह्यात या वर्षी ऐन दिवाळीत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुंडे हे दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पाच दिवस पाहणी, चर्चा आणि संवाद साधत आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथून केली. यावेळी पाण्याअभावी उद्ध्वस्त झालेल्या पिकांची पाहणी केली. त्यानंतर बर्दापूर येथील महादेव मंदिरात परिसरातील ७ गावांतील शेतकरी, दुष्काळग्रस्तांशी संवाद साधला. दुसºया दिवशी बुधवारी त्यांनी परळी तालुक्यातील नागापूर भागातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करुन शेतकºयांशी संवाद साधला. बुधवारी परळी तालुक्यातील नागापूर भागात दौरा केला. परळी भागातील शेतकºयांच्या उसाचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे, प्रसंगी आपण आपले प्राण गहाण ठेवू मात्र शेतकºयांचा ऊस गाळपाअभावी शिल्लक राहू देणार नाही, असा दिलासाही त्यांनी शेतकºयांना दिला.निसर्गासोबतच सरकारशी दोन हात करण्यासाठी मी तुमच्या खांद्याला खांदा लावून लढा देईल, असे ते म्हणाले. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याने आपल्याला निसर्गासोबतच सरकारशीही दोन हात करावे लागणार आहेत, पाच वर्ष केवळ फसवणूकच केली. आताही तेच सुरू आहे, पाणी टंचाई, वीज टंचाई, चारा टंचाई असताना सरकार जाचक निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले.शेतकºयांच्या जनावरांना दावणीला चारा देण्याऐवजी त्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याचा सरकारचा निर्णय असाच तुघलकी असून, हे सरकार अनुदानासाठी जनावरांसोबत सेल्फी काढून पाठवा अशी मागणीही करेल, अशी बोचरी टीका मुंडे यांनी केली.यावेळी त्यांच्यासमवेत गोविंदराव देशमुख, रणजित लोमटे, माजी राजेभाऊ औताडे, विलास मोरे, शिवहार भताने, तानाजी देशमुख, सुधाकर शिनगारे, समीर पटेल, गणेश देशमुख, अजय मुंडे, माऊली गडदे, विष्णूपंत देशमुख, मोहनराव सोळंके आदी उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडState Governmentराज्य सरकारDhananjay Mundeधनंजय मुंडे