Laxman Hake ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा अजूनही तपास सुरू आहे. या प्रकरणात अटकेत असलेले सर्व आरोपी धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याचा आरोप आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात पोलिसांवर दबाव येत आहे. यामुळे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे, या मागणीवरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दमानिया यांच्यावर आरोप केले.
शिवसेना पदाधिकाऱ्याचं अपहरणाचं गौडबंगाल; अंधाराचा फायदा घेत आरोपी झाला पसार
अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या मागणीवरुन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दमानिया यांच्यावर टीका केली. आज पत्रकारांसोबत संवाद साधताना लक्ष्मण हाके म्हणाले, अंजली दमानिया यांनी कोर्टात अॅफिडेव्हिट करून पुरावे द्यावेत. त्याचा काहीतरी फायदा होईल, कारण याचं अंजली दमानिया यांनी दुसऱ्या तिसऱ्या आरोपीची हत्या झाल्याचे म्हंटले होते. त्यांच्या एका ट्विटमुळे गोंधळ निर्माण झाला, त्यामुळे पोलिसांनी त्यांना नोटीस द्यावी लागली होती. त्यामुळे दमानिया असो किंवा संदीप क्षीरसागर असो, कोणाचा तरी राजीनामा घेणं धनंजय मुंडे यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी हे काम करत आहेत, असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.
हाके म्हणाले, त्यामुळे असल्या चिल्लर गोष्टींना उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाही. कोण कुठल्या दमानिया सिलेक्टेड प्रोग्रॅम राबवतात. त्या कोणाच्या तरी इशाऱ्यावर नाचतात, असा आरोपही हाके यांनी केला.
दमानिया यांनी काय आरोप केले?
बीडची घटना माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आहे, त्याचे मी कुठेही समर्थन करत नाही, असे त्यांचे मत असल्याचे त्यांनी सांगितले. मग त्यावर माझे म्हणणे होते की, मग तुम्ही राजीनामा का घेत नाही. या प्रकरणातील सगळे पुरावे घेऊन मी त्यांना भेटायला गेले. आज मी त्यांना दाखवले आहे की, कसे धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे एकत्र संबंध कसे आहेत. त्यांच्या कंपन्यांत आर्थिक नफा कसा मिळत आहे. तसेच ऑफिस ऑफ प्रॉपर्टीमध्ये हे सर्व कसे बसत आहे. त्यामुळे तुम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, असे सांगितले. गृह मंत्रालयाने आमदार, मंत्र्यांसाठी जे निर्देश दिले आहेत, तेही दाखवले आहेत, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली.