शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना टीप दिल्याचा राग; टोळक्याने बेदम मारहाण करत तरुणाचा घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 13:35 IST

जुना वाद विकोपाला गेला ;सहा जणांच्या टोळक्याने तरूणाचा जीव घेतला!

- नितीन कांबळेकडा- चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांना नाव सांगितल्याचे कारण काढत एका ३६ वर्षीय तरूणास सहा जणांनी धारदार चाकू,दगड,बांबूने बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दैठणा येथे बुधवारी (दि.६)  सायंकाळी घडली. एवन हैवान काळे ( रा.चिखली ता.आष्टी ) असे मयत तरूणाचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील केळपिंपळगांव येथे २०१७ रोजी चोरीची घटना घडली होती. यात काही आरोपींना अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांना आमचे नाव का सांगितले, असा जाब एवन काळे यास विचारत सहा जणांनी दैठणा येथील वाकी-मिरजगाव रोडवर ६ डिसेंबर रोजी सायंकाळी चाकू,दगड,बांबूने बेदम मारहाण केली. यात एवन काळे गंभीर जखमी झाला. अहमदनगर येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. 

माहिती मिळताच घटनास्थळी आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे, पोलिस अंमलदार सचिन गायकवाड, दिपक भोजे,मजरूद्दीन सय्यद, यांनी भेट दिली.दरम्यान, याप्रकरणी मयताची पत्नी सचिनाबाई उर्फ कांचन एवन काळे हिच्या फिर्यादीवरून आरोपी संदिप उध्दव काळे,कानिफनाथ उध्दव काळे,संदीप ईश्वर भोसले,कृष्णा विलास भोसले,अजय विलास भोसले,उध्दव आगुचंद काळे ( सर्व रा.वाकी ता.आष्टी) यांच्याविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी फरार असून पोलिस तपास पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे अधिक तपास करत आहेत. 

तपासाठी दोन पथके रवानासदरील घटनेचे गांभीर्य ओळखून आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, पोलिस उपनिरीक्षक अजित चाटे यांच्या नेतृत्वात दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात येतील असे तपास अधिकारी चाटे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड