शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

बीडमध्ये काका-पुतण्याचा रणसंग्राम; आज शरद पवारांची तर २७ ऑगस्टला अजितदादांची सभा

By सोमनाथ खताळ | Updated: August 17, 2023 12:07 IST

शरद पवारांची आज स्वाभिमान सभा तर पुढच्या रविवारी अजित पवारही बीडमध्ये घेणार सभा

बीड : राज्यात राजकीय घडामोडी घडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे गुरूवारी बीडमध्ये स्वाभिमान सभा घेत आहेत. पुतण्या अजित पवार यांच्यासह कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ते कडाडून टीका करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सभेचे नियोजन जिल्हाध्यक्ष तथा आ. संदीप क्षीरसागर यांनी केले आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांची सभा होण्याआधीच मंत्री धनंजय मुंडे यांनीही २७ ऑगस्टला सभेचे आयोजन केले आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये येणार आहेत. काकांनी केलेल्या टीकेला ते पुढच्या रविवारी सभेच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मागील पाच वर्षांत राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीचे सरकार बदलून भाजप-शिवसेना सरकार स्थापन झाले. नंतर विरोधात असणारे राष्ट्रवादीचे अजित पवारही आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली. या घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन पहिली सभा घेतली. त्यानंतर आता गुरूवारी त्यांनी बीडमध्ये सभा घेण्याचे ठरविले आहे. याला स्वाभिमान असे नाव देण्यात आले असून, याचे नियोजन जिल्हाध्यक्ष तथा बीडचे आ. संदीप क्षीरसागर यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. मागील आठवड्यापासून आ. क्षीरसागर यांनी जिल्हा पिंजून काढला आहे. या सभेला २० हजारपेक्षा जास्त लोक येतील, असे नियोजन करण्यात आले आहे. या सभेला शरद पवार यांच्यासह जितेंद्र आव्हाड, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

बीडमध्ये अजित पवार गट मजबूतजिल्ह्यात अजित पवार यांचा गट मजबूत आहे. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह आ. प्रकाश साेळंके, आ. बाळासाहेब आजबे हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. शिवाय ११ पैकी १० तालुकाध्यक्षही अजित पवारांसोबत आहेत. शरद पवार गटाकडून केवळ बीडचे आ. संदीप क्षीरसागर आहेत. त्यामुळे ही सभा यशस्वी करण्याचे आव्हान आ. क्षीरसागर यांच्यासमोर असणार आहे.

अजित पवारांचीही बीडमध्येच सभाशरद पवारांची सभा गुरूवारी होत आहे. त्या अनुषंगाने रविवारीच अजित पवार यांच्या सभेचेही २७ ऑगस्ट रोजी नियोजन केल्याचे राष्ट्रवादीतील अजित पवार गटाकडून सांगण्यात आले. मंत्री धनंजय मुंडे हे या सभेचे नियोजन करणार असून, सायंकाळी ५ ते ६ अशी सभेची वेळ निश्चित केली जाणार आहे. ठिकाणाची चाचपणी सुरू आहे. शरद पवारांनी ज्या टीका केल्या, प्रश्न विचारले, त्याला उत्तर २७ ऑगस्ट रोजीच्या सभेतून दिले जाण्याची शक्यता आहे.

जागा निश्चित करणे सुरु उपमुख्यमंत्री अजित पवार यांची २७ ऑगस्ट रोजी बीडमध्ये सभा होणार आहे. सायंकाळी ५ ते ६ वाजताची वेळ असणार आहे. जागा निश्चित करणे चालू आहे.- राजेश्वर चव्हाण, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार गट)

आजच्या सभेसाठी अशी असेल पार्किंग व्यवस्थाआष्टी-पाटोदा-शिरूर कासारकडून बीडकडे येणाऱ्या वाहनांसाठी जुनी पंचायत समिती कार्यालयाचे आवार, आयटीआय ग्राउंड, चंपावती शाळेचे मैदान, तहसील कार्यालय येथील मागच्या बाजूचे आवार, शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. माजलगाव-गेवराई-गढीकडून बीडकडे येणाऱ्या वाहनांसाठी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, जिल्हा परिषद कार्यालय याठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. परळी-अंबाजोगाई-केज-धारूर-वडवणीकडून बीडकडे येणाऱ्या वाहनांसाठी सर्कस ग्राउंड, मित्रनगर व छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण तसेच बागलाने इस्टेट, नाट्यगृह रोड, बीड याठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीड