शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिऊ नको म्हणून बजावल्याने गेला जीव; संतापलेल्या नातवाने आजोबांचा केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 18:35 IST

दारूवरुन शिवीगाळ केल्याने पुन्हा दारू पिऊन केला आजोबाचा खून

- मधुकर सिरसटकेज :  येथील वकीलवाडी परीसरातील सिद्धीविनायक मंदिरासमोर दर्शनासाठी आलेल्या आजोबाच्या डोक्यात व मानेवर धारदार शस्त्राने सपासप वार करून नातवाने खून केल्याची घटना मंगळवारी (दि.5) सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान घडली. त्यानंतर आरोपी नातवाने पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. गिरधारी किसनलाल शिल्लक असे मृताचे नाव आहे.

गिरधारी किसनलाल शिल्लक ( 60) आज सकाळी  साडेसात वाजेच्या सुमारास  वकीलवाडी भागातील कानडी रोडलगत असलेल्या सिद्धी विनायक मंदिरात दर्शनासाठी  आले होते. देवदर्शन करून मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर येताच दबा धरून बसलेला चुलत नातू रोहित रतन शिल्लक  ( 25 वर्षे. रा.केज) याने गिरधारी यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. गिरधारी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्यानंतर रोहीतने थेट केज पोलीस स्टेशन गाठत आत्मसमर्पण केले. ठाणे अंमलदार सुधाकर दौंड यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना दिली. पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, आनंद शिंदे, पोलीस नाईक संतोष गिते,  मतीन शेख ,प्रकाश मस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, नातेवाईकांनी गंभीर अवस्थेतील गिरधारी यांना थेट अंबाजोगाई येथील स्वाराति ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे तपासणी करुन डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. 

१३ वार केल्याची कबुली...!तू खुप व्यसनी आहेस, दारु पिने बंद कर, असे म्हणत आजोबांनी रात्री आई-बहीणीवरुन  शिवीगाळ केल्याने पहाटेच पुन्हा दारु पिलो, गांजा ओढला. त्यानंतर रागाच्या भरातच आजोबाच्या डोक्यात आणि मानेवर 13 वार केले, अशी कबुली आरोपी रोहित याने दिली. तो रक्ताने माखलेले हात, रक्ताने भरलेल्या कपड्यांसह पोलीस स्टेशनला हजर झाला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड