शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सुटीत गावाकडे आलेला इंजिनिअरिंगचा विद्यार्थी तलावात पोहताना बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 17:03 IST

परळी - अंबाजोगाई रस्त्यावर असलेल्या भोपळा गावाजवळील तलावात पाणी भरपूर असल्याने परिसरातील अनेक जण येतात.

परळी: तालुक्यातील भोपळा येथील लघु तलावातील पाण्यात पोहत असताना  बुधवारी सकाळी आठच्या सुमारास २२ वर्षीय युवक बेपत्ता झाला आहे. गणेश माणिकराव फड  ( रा कन्हेरवाडी ) असे  बेपत्ता युवकाचे नाव असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.                 गणेश हा पुणे येथे आभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून गेल्या पंधरवड्यात तो आपल्या गावाकडे  सुट्टी साठी आला.

तलावात बेपत्ता झालेल्या गणेश फडचा शोध घेण्यासाठी नगरपालिकेच्या नैसर्गिक आपत्ती निवारण व अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून प्रयत्न सुरू केले आहेत.  बोटीतून शोध मोहीम चालू असलीतरी दुपारपर्यंत युवकाचा शोध लागलेला नव्हता .तसेच परभणी जिल्ह्यातील मानवत येथील पोहणाऱ्याची टीम ही तलावात  दुपारी १२ पासून उतरून शोध घेत आहेत. घटनास्थळी परळी तहसीलदार व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. 

परळी - अंबाजोगाई रस्त्यावर असलेल्या भोपळा गावाजवळील तलावात पाणी भरपूर असल्याने परिसरातील अनेक जण येतात. उन्हाळ्यातही भोपळा तलावात पोहणाऱ्यांची गर्दी झाली होती. आज, १९ जून रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कन्हेरवाडी येथील गणेश माणिकराव फड हा आपल्या काही मित्रासोबत भोपळा तलावात पोहण्यासाठी आला. पोहत असताना मित्र पुढे गेले आणि गणेश मागे राहिला. त्यानंतर गणेश फड बेपत्ता झाल्याचे समजले. 

माहिती मिळताच अनेकांनी तलावात गणेशचा शोध घेतला. तसेच नपच्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली आहे. दुपारपर्यंत बेपत्ता युवकाचा शोध लागला नव्हता. शोध मोहीम जोरात सुरू आहे. प्रशासनाकडून प्रयत्न जारी आहेत अशी माहिती परळी ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे यांनी दिली. तलावाच्या ठिकाणी परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर,पोलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे,गोविंद बडे यांनी भेट दिली.

टॅग्स :Beedबीडdrowningपाण्यात बुडणे