शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अंबाजोगाईकर सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 17:55 IST

मानवलोकचे ब्रम्हनाळमध्ये मदत कार्य सुरु 

ठळक मुद्दे७७ हजाराचा जमला निधीअन्नधान्याचीही मिळाली मदत

अंबाजोगाई (बीड) : कोल्हापुर-सांगली जिल्ह्यातील अनेक गावात अडकलेल्या लाखो नागरिकांना आर्थिक आणि अन्नधान्याची मदत करण्यासाठी अंबाजोगाईकर सरसावले असून रोटरी क्लब आँफ अंबाजोगाई सिटीच्या पुढाकाराने निघालेल्या मदत फेरीत सर्व सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग घेत भरीव आर्थिक निधी आणि अन्नधान्यांसह इतर वस्तुंची मदत जमा केली. शहरातील सामान्य माणसांसह अनेक प्रतिष्ठानने या मदतीत आपला खारीचा सहभाग घेतला.

कोल्हापुर-सांगली जिल्ह्यातील अनेक गावातील लाखो लोक पुरात आडकलेले असतांना या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अंबाजोगाईकर केंव्हा पुढे सरसावरणार अशी चर्चा चालू असतांनाच पत्रकार अ.र. पटेल यांनी "अंबाजोगाईकर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे कधी सरसावरणार?" अशी पोस्ट टाकल्या नंतर मदतफेरीच्या नियोजनासाठी रोटरी क्लब च्या वतीने पुढाकार घेण्यात आला व शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या, लोकप्रतिनिधींच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागाने निघालेल्या या रँलीस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला व एवढी मोठी मदत जमली.

७७,१६० हजाराचा जमला निधीअंबाजोगाई शहरातील प्रमुख रस्त्यावरुन निघालेल्या या मदत फेरीत शहरातील सर्वसामान्य माणसांसह विविध व्यापारी प्रतिष्ठाने, हातगाडे वाले, टपरी धारक, छोटे-मोठे व्यावसायिक, सामान्य माणसांनी दिलेल्या निधीतून ७७, १६० हजाराचा निधी जमा झाला. यात २३ हजाराची भर टाकून एक लाख रुपयांचा निधी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

यांनी घेतला सहभागरोटरी क्लब आँफ अंबाजोगाई सिटी यांच्या पुढाकाराने आज सकाळी ११ वाजता नगर परीषद कार्यालय परीसरातुन  निघालेल्या या मदत फेरीत मानवलोक, मनस्विनी, इनरव्हील कल्ब, योगेश्वरी रोटरी क्लब, प्लास्टिक मुक्ती अभियान, भारतीय जैन संघटना, पत्रकार संघ, हेमंत राजमाने सेवाभावी संस्था, स्वाराती महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, योगेश्वरी महाविद्यालय, खोलेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थी, वेणुताई कन्या शाळा मधील मुली यांच्यासह अक्षय मुंदडा, संजय दौंड, दगडु लोमटे, बबन लोमटे, आनंद लोमटे, संजय गंभीरे, अँड. संतोष लोमटे, संतोष शिनगारे, दिनेश भराडिया, संजय साळवे, जनार्धन मुंडे, सिध्दे्श्वर स्वामी, मनोज महेंद्रकर,  यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग होता.

मानवलोकची ब्रम्हणाळ येथेमोठी मदत सुरु.....कोल्हापुर-सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वात मोठा पुढाकार घेतला तो मानवलोक या सेवाभावी संस्थेने. या संस्थेने काल ९ आँगस्ट रोजीच दोन लाख रुपयांची औषधी, दीड लाख रुपयांचे होजिअरी कपडे, तीन जेसीबी, यांच्यासह मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांच्या नेतृत्वाखाली ब्रम्हणाळ  येथे टीम पोहंचली असून प्रत्यक्ष मदत कार्यास सुरुवात ही झाली आहे.  या मदततुकडीतील स्वयंसेवकांमध्ये माणिक कुकडे, प्रा. किसन शिनगारे, लक्ष्मिकांत धुमाळ, अभिजित कापसे, प्रा. परमेश्वर साळुंके, आणि  जेसीबी आँपरेटर प्रभाकर बाळेकर, महेश बाळेकर, राधाकिशन रानभरे, नवनाथ सरवदे यांचा समावेश आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या या टीम मधील प्रा. किशन शिनगारे हे ब्रम्हणाळ येथील रहिवासी असल्यामुळे ब्रम्हणाळ येथील गरजू लोकांपर्यंत मानवलोकची मदत पोहंचली आहे. पुरग्रस्तांच्या गरजा लक्षात घेवून यापुढे मानवलोक यापुढे मदत करेल असे मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी सांगितले. यापुढे पूरग्रस्तांना नवीन होजिअरी कपड्यांची मदत करण्याची जास्त आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

तीन लाखाच्या सामानाची मदतया मदत फेरीत ७७ हजाराच्या नगदी मदतीसह गहु, तांदुळ, साखर, मीठ, ज्वारी, आटा, यांचे अनेक कट्टे, साबण, पेस्ट, बिस्कीट, तेलाचे बाँक्स, पाणी बाँटल बाँक्स, प्लास्टिक मग, घागरी, झाडु, खराटे, एल एडी बब्ल, टाँवेल, नँपकीन, दंतमंजन आदि साहित्याचे अनेक बाँक्स, ताडपत्री, आणि दैनंदिन वापराचे इतर साहित्य मोठ्या प्रमाणावर जमा झाले आहे.

सारंग पुजारी मित्रमंडळाच्या वतीने ३०० कीट; १०० ब्लँकेटकोल्हापुर -सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अंबाजोगाई नगर परीषदेचे माजी उपाध्यक्ष सारंग पुजारी यांनी आपल्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करुन जीवनावश्यक वस्तुंच्या ३०० कीट आणि १०० ब्लँकेटची मदत देवू केली आहे. मानवलोक संस्थेच्या वतीने ब्रम्हणाळ व इतर गावात ही मदत पोहंचवण्यात येणार असून ही मदत मानवलोक कडे सुपुर्द करण्यात आली आहे.

टॅग्स :floodपूरAmbajogaiअंबाजोगाईBeedबीड