शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत ऐन चौकात ट्रॅव्हल्स पलटी; सुदैवाने जीवितहानी झाली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 09:18 IST

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाला वळसा घालताना खासगी लक्झरी बस पलटी झाली.

- अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई ( बीड)  - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाला वळसा घालताना खासगी लक्झरी बस पलटी झाली. हा अपघात आज रविवारी (दि.०८) रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडला. सुदैवाने यात कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, सदरील बस एका कारवर पडल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे.

गजराज ट्रॅव्हलची लक्झरी बस (एमएच २४ एबी ८८५५) पुण्याहून अंबाजोगाईकडे येत होती. भरधाव वेगाने छत्रपती शिवाजी महाराज चौकाला वळसा घालताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. यावेळी बसमध्ये ४ ते ५ प्रवाशी होते. सुदैवाने त्यांना कसलीही इजा झाली नाही. दरम्यान, बस पलटी होत असताना ती एका आर्टिगा कारवर पडल्याने कारचे (एमएच १४ एचडी ८८१४) मात्र मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कारचालक दूध घेण्यासाठी गाडीच्या बाहेर आलेला असल्याने तो बचावला. अपघाताची माहिती मिळताच ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना तातडीने बोलावून घेतले. दरम्यान, क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त बस चौकातून हलवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी नंदकिशोर मुंदडा, पोलीस निरिक्षक विनोद घोळवे यांचे प्रयत्न सुरू आहेत.