शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत व्यापाऱ्याची चार लाखांची बॅग पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 23:56 IST

शहरातील गजबजलेल्या हाऊसिंग सोसायटी भागातून भरदिवसा मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी आडत व्यापा-याची चार लाखांची रक्कम असलेली बॅग लंपास केली. ही घटना बुधवारी सकाळी ११.४५ वाजता घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई: शहरातील गजबजलेल्या हाऊसिंग सोसायटी भागातून भरदिवसा मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी आडत व्यापा-याची चार लाखांची रक्कम असलेली बॅग लंपास केली. ही घटना बुधवारी सकाळी ११.४५ वाजता घडली.धर्मराज किसनराव बिरगड यांचे अंबाजोगाईतील मोंढ्यात आडत दुकान आहे. सध्या सोयाबीनचा सीजन असल्याने बिरगड यांना रोजच बँकेतून लाखावर रक्कम काढून आणून ती ग्राहकांना वाटप करावी लागते. गुरूवारी सकाळी साडेअकरा वाजता त्यांनी अंबाजोगाई पीपल्स बँकेतून ३ लाख ८७ हजार २०० रुपये काढून पिशवीत ठेवले आणि ती पिशवी स्कुटी गाडीवर (एमएच ४४ आर २९६५) दोन्ही पायाच्या मध्ये ठेवली. ते योगेश्वरी प्राथमिक शाळेपासून वळून मोंढ्याच्या दिशेने निघाले असता ११.४५ वाजताच्या सुमारास मागून मोटारसायकल वरून आलेल्या दोघा युवकांनी ओव्हरटेक करताना त्यांना ‘पाठीमागे तुमचे पैसे पडले आहेत’ अशी बतावणी केली. याला भुलून बिरगड यांनी गाडी वळविली आणि खाली वाकून पडलेले पैसे उचलू लागले. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांची पैश्याची बॅग घेऊन पोबारा केला. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असणारे भूषण ठोंबरे यांनी चोरट्यांचा पाठलाग केला, परंतु ते सापडले नाहीत. अखेर धर्मराज बिरगड यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे गाठून चोरीची तक्रार दिली. या प्रकरणी दोघा अनोळखी चोरट्यांवर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सहा. पोलीस निरीक्षक मारोती मुंडे करत आहेत.

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईCrime Newsगुन्हेगारी