अंबाजोगाई : देशपातळीवरील स्वच्छता सर्वेक्षण - २०१९ चे निकाल बुधवारी राष्ट्रपती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले. ‘नाविन्यपूर्ण उत्कृष्ट उपक्रम’ या प्रकारात अंबाजोगाई नगर पालिका पाच राज्यांचा समावेश असलेल्या पश्चिम विभागातून सर्वप्रथम आली आहे.स्वच्छता सर्वेक्षण - २०१९ या मोहिमेत देशभरातील ४५०० नगर पालिकांनी सहभाग नोंदविला होता. या विभागात महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेश या पाच राज्यांचा समावेश आहे. या विभागातील ५० हजार ते एक लाख लोकसंख्येच्या गटात अंबाजोगाई नगर पालिकेने बाजी मारत या पुरस्कारावर आपले नाव कोरले.आजवरच्या इतिहासात प्रथमच अंबाजोगाई नगर पालिकेला देशपातळीवरील एवढा मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. यानिमित्ताने नगर पालिकेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि सफाई कामगारांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.सर्व श्रेय नागरिक व सफाई कामगारांचे : नगराध्यक्षा मोदीनगरपालिकेने वेळोवेळी राबविलेल्या उपक्र मांना आणि स्वच्छतेच्या आवाहनांना नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सोबतच हे सर्व उपक्र म पूर्णत्वास नेण्याचे काम शहरातील सफाई कामगारांच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकले. राष्ट्रपतींकडून मिळालेला पुरस्कार हुुरूप वाढविणारा आहे, अशी प्रतिक्रि या नगराध्यक्षा रचना मोदी यांनी यानिमित्ताने दिली.
नाविन्यपूर्ण उत्कृष्ट उपक्रमात अंबाजोगाई नगरपालिका पाच राज्यांतून सर्वप्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:48 IST
देशपातळीवरील स्वच्छता सर्वेक्षण - २०१९ चे निकाल बुधवारी राष्ट्रपती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले. ‘नाविन्यपूर्ण उत्कृष्ट उपक्रम’ या प्रकारात अंबाजोगाई नगर पालिका पाच राज्यांचा समावेश असलेल्या पश्चिम विभागातून सर्वप्रथम आली आहे.
नाविन्यपूर्ण उत्कृष्ट उपक्रमात अंबाजोगाई नगरपालिका पाच राज्यांतून सर्वप्रथम
ठळक मुद्देराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे झाला सन्मान