शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडी घटनेच्या निषेधार्थ अंबाजोगाईत महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:06 IST

कासारसाई-हिंजवडी (ता.मावळ जि.पुणे) येथील ऊसतोड कामगार कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अंबाजोगाईत गुरूवारी महामोर्चा काढण्यात आला. यासाठी अन्याय-अत्याचार विरोधी कृती समितीने पुढाकार घेतला. ‘वुई वॉन्ट जस्टीस’, भारत माता की जय, वंदे मातरम्च्या नाऱ्यांनी परिसर दणाणून गेला होता. शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा निघाला होता.

ठळक मुद्देशाळा, महाविद्यालयांचा सहभाग : अन्याय-अत्याचार विरोधी कृती समितीचा पुढाकार; पथनाट्यातून केली निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : कासारसाई-हिंजवडी (ता.मावळ जि.पुणे) येथील ऊसतोड कामगार कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अंबाजोगाईत गुरूवारी महामोर्चा काढण्यात आला. यासाठी अन्याय-अत्याचार विरोधी कृती समितीने पुढाकार घेतला. ‘वुई वॉन्ट जस्टीस’, भारत माता की जय, वंदे मातरम्च्या नाऱ्यांनी परिसर दणाणून गेला होता. शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा निघाला होता.काळ्या फिती लावून, निषेधाच्या घोषणा देवून बॅनर, फलक घेवून शहरातील शाळा, महाविद्यालयातील एक हजारहून अधिक विद्यार्थिनी, युवती, युवक यांच्यासह नंदकिशोर मुंदडा, नगरसेवक संजय गंभिरे, प्रा.अरूंधती पाटील, बालासाहेब शेप, संतोष काळे, अनंतराव घुले, विजय अंजाण, सचिन केंद्रे, वैजेनाथ देशमुख, प्रा.रमा पांडे, संध्या आरबाड आदींसह सामाजिक व राजकिय क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते, मान्यवर सहभागी झाले. शिवाजी चौकात व उपविभागीय कार्यालयासमोर पथनाट्य सादर करून निदर्शने करण्यात आली. यावेळी आकांक्षा नवले पाटील व अमृता धानोरकर या मुलींनी महामोर्चास संबोधित केले.अन्याय-अत्याचार विरोधी कृती समितीने उपजिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कासारसाई-हिंजवडी, ता.मावळ जि.पुणे येथील ऊसतोड कामगार कुटूंबातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºया नराधमास कडक शासन करून त्यांना फाशी द्यावी, हा खटला जलदगती कोर्टात चालवावा, पीडित कुटूंबाच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाने घेवून त्यांना अर्थसहाय्य देण्यात यावे, पीडित कुटूंबाचे पुनर्वसन करावे. सदरच्या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या. निवेदनावर अन्याय-अत्याचार विरोधी कृती समिती, अनंतराव घुले, गोविंद इप्पर, प्रा.नारायण सिरसाट, अनिरूध्द फड, सुधीर माले, दिनेश कराड, विजय चाटे, स्वप्निल बडे, श्रीकांत नागरगोजे, अ‍ॅड.सचिन शेप, अ‍ॅड.अशोक मुंडे, अविनाश गित्तेसह ५० पेक्षा जास्त लोकांच्या स्वाक्षºया निवेदनावर आहेत.

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईStudentविद्यार्थीMorchaमोर्चा