शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष बदलला असला तरी मी नियत अजून बदललेली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:07 IST

पक्ष बदलला असला तरी मी नियत अजुन बदललेली नाही. मी कुठेही असलो तरी समाजसेवा सोडत नाही. माझ्या भागाचा, जिल्ह्याचा विकास हाच माझा धर्म आणि जात आहे, म्हणूनच आज शिवसेनेत असलो तरी सर्व जातीधर्माची माणसे माझ्यासोबत आहेत, खांद्याला खांदा लावून माझ्या विजयासाठी कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता मेहनत घेत आहेत, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : जिल्ह्याचा विकास हाच माझा धर्म आणि जात

बीड : पक्ष बदलला असला तरी मी नियत अजुन बदललेली नाही. मी कुठेही असलो तरी समाजसेवा सोडत नाही. माझ्या भागाचा, जिल्ह्याचा विकास हाच माझा धर्म आणि जात आहे, म्हणूनच आज शिवसेनेत असलो तरी सर्व जातीधर्माची माणसे माझ्यासोबत आहेत, खांद्याला खांदा लावून माझ्या विजयासाठी कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता मेहनत घेत आहेत, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.खडकपुरा व वतारवेस येथे कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे, सचिन मुळुक, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, भाजपाचे भगिरथ बियाणी, सलिम जहाँगीर, सुशील पिंगळे, सागर बहीर, विकास जोगदंड, रामिसंग राख, दिलीप भोसले, शुभम कांतांगळे, आदिंची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले की, निवडणुकीत अफवा पसरविल्या जातात. भावनिक आणि जातीयवादी अफवापासून मतदारांनी दूर रहावे. शिवसेना हा जातीयवादी नसून या पक्षात सर्वांनाच सामावून घेतले जाते. सत्तेत असो वा नसो अल्पसंख्याक समाज माझ्यासोबतच राहिला आहे. सर्वानाच मदत करायची माझी भावना या समाजाने अनुभवली आहे. मी कधीही जातीवाद किंवा भाउक विधाने करु न कुणाचे मन दुखावले नाही, असे जयदत्तअण्णा म्हणाले.माजी खासदार केशरकाकू यांच्यापासून सर्वधर्मसमभावाचे तत्व अंगिकारले आहे. बीड जिल्ह्यात सामाजिक ध्रुवीकरण करून विकासाच्या मुद्यावरच आपण निवडणुका लढल्या आहेत. आमचा चांगुलपणा ही आमची ताकद आहे. म्हणूनच आम्ही कुठेही असलो तरी मतदार आमच्यासोबतच असतो, हे सत्य आहे, असेही क्षीरसागर म्हणाले.यावेळी अनिल जगताप यांनीही मार्गदर्शन करताना जयदत्तअण्णांनी विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांसह सर्वांनाच भेदाभेद न करता सहकार्य कसे केले हे सांगितले. अण्णांच्या विजयासाठी शिवसैनिक रात्रदिवस मेहनत घेत असल्याचे जगताप म्हणाले.विजयासाठी वज्रमुठ आवळा - नितीन बानगुडे पाटीलचौसाळा : जयदत्त क्षीरसागर यांना विकासाची दुरदृष्टी आहे. विधानसभा निवडणूक म्हणजे पोरखेळ नाही. सभागृहात प्रश्न मांडण्यासाठी, विकास योजना आणण्यासाठी उमेदवार हा अभ्यासू असावा लागतो.जयदत्तअण्णांना निवडून आणा, त्यांचे मंत्रीपद पक्के आहे, अशा शब्दात शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी चौसाळा येथे मतदारांना आवाहन केले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv Senaशिवसेना