शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात १० हजार बुद्धमूर्तींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 01:15 IST

बुद्धधम्माचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी येत्या बुद्धजयंतीपासून बीड जिल्ह्यात महाअभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात ‘गाव तिथे बुद्ध विहार आणि घर तिथे बुद्धमुर्ती’ ही संकल्पना ठेवून पहिल्या टप्प्यात जिल्हाभरात दहा हजार बुद्धमूर्तींचे वाटप करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देगाव तेथे बुद्धविहार; घर तेथे बुद्धमूर्ती : ३० एप्रिलला पहिल्या मूर्तीचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बुद्धधम्माचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी येत्या बुद्धजयंतीपासून बीड जिल्ह्यात महाअभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात ‘गाव तिथे बुद्ध विहार आणि घर तिथे बुद्धमुर्ती’ ही संकल्पना ठेवून पहिल्या टप्प्यात जिल्हाभरात दहा हजार बुद्धमूर्तींचे वाटप करण्यात येणार आहे.३० एप्रिल रोजी बीड शहरातील पंचशीलनगर भागातील बुद्ध विहारात सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या अभियानांतर्गत पहिल्या बुद्धमूर्तीचे वाटप करण्यात येणार आहे. या महाधम्म अभियान सोहळ्यात समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.बीड येथील सिद्धीविनायक कॉम्पलेक्स भागात संपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या महाधम्म अभियानासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय भन्तेजी व धम्मसेवकांच्या उपस्थितीत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत.महाधम्म अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक समाज बांधवाने आपले योगदान देऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने समाज बांधवांना करण्यात आले आहे.धम्मचळवळ गतिमान करण्यासाठी विविध कार्यक्रमबीड जिल्ह्यात धम्मचळवळ अधिक गतिमान करण्यासाठी, बुद्ध धम्माच्या प्रसारासाठी महाधम्म अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक गावात बुद्धविहार, समाज मंदिराची उभारणी करण्यासाठी शासन दरबारी व लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.प्रत्येक समाज बांधवांच्या घरात बुद्धमूर्ती असावी व आहेत ती बुद्धविहारे धम्मकेंद्र बनावीत, असा यामागील प्रमुख उद्देश आहे. या महाधम्म अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात ठिकठिकाणी बौद्ध धम्म परिषदा, श्रामनेर शिबीर, धम्म स्पर्धा, धम्मदेसना आदि कार्यक्र म घेण्यात येणार आहेत.या कार्यक्रमासाठी संयोजन समितीतर्फे सर्व तयारी करण्यात आली असून, त्या दृष्टीने सर्व नियोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या निमित्त होणाऱ्या सर्व विविध कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर झाली.

टॅग्स :BeedबीडMarathwadaमराठवाडाSocialसामाजिक