शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीनही संच बंद; वीज निर्मिती शून्यावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 14:21 IST

राज्यात पावसामुळे वीज मागणी कमी झाल्याने परळीतील तीनही संच बंद ठेवण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले.

- संजय खाकरेपरळी (जि. बीड) : मराठवाड्याच्या हृदयस्थानी असलेल्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीनही संच बंद ठेवण्यात आल्याने वीज निर्मिती पूर्णतः ठप्प झाली आहे. नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील एकूण ७५० मेगावॅट क्षमतेपैकी सध्या शून्य वीज निर्मिती होत असल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी समोर आली आहे.

राज्यात पावसामुळे वीज मागणी कमी झाल्याने परळीतील तीनही संच बंद ठेवण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, संपूर्ण मराठवाड्यातील हे एकमेव औष्णिक विद्युत केंद्र आहे, जे येथे धडधडत होते. परळी तालुक्यातील दादाहारी वडगाव व दाऊतपूर शिवारातील नवीन औष्णिक केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचे तीन संच आहेत. यातील संच क्रमांक सहा व सात हे दोन संच मागील १५ दिवसांपासून बंद आहेत, तर संच क्रमांक आठ तब्बल महिनाभरापासून बंद आहे. यामुळे परळीतील औष्णिक विद्युत केंद्राची वीज निर्मिती सध्या संपूर्ण थांबली आहे. विद्युत संच बंद ठेवण्यात आल्याने, कोळशाचा पुरवठादेखील कमी प्रमाणात होत असल्याने ही स्थिती अधिक बिकट झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच बंद ठेवलेले संच पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती औष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी दिली.

८०० अधिकारी, कर्मचारीराज्यात विजेची मागणी वाढल्यानंतर हे संच कार्यरत होतील. दरम्यान, या नवीन औष्णिक केंद्रात सुमारे ८०० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. मात्र, तीनही संच बंद असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये हे संच कधी सुरू होतील, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Beedबीडelectricityवीजmahavitaranमहावितरण