शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दारूसाठी ‘तो’ बनला दुचाकीचोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:02 IST

वडिलांचे छत्र हरवल्यानंतर त्याला दारूचे व्यसन जडले. जुगार खेळण्यासाठी व दारू पिण्यासाठी पैसे कमी पडल्याने त्याने दुचाकीचोरीचा व्यवसाय निवडला.

ठळक मुद्देएलसीबीने केला पर्दाफाश : जालना, बीडमधील चार दुचाकी जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : वडिलांचे छत्र हरवल्यानंतर त्याला दारूचे व्यसन जडले. जुगार खेळण्यासाठी व दारू पिण्यासाठी पैसे कमी पडल्याने त्याने दुचाकीचोरीचा व्यवसाय निवडला. चार दुचाकीही चोरल्या. पाचवी दुचाकी चोरण्याच्या तयारीत असतानाच त्याच्या बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून जालना व बीडमधील चार दुचाकी जप्त केल्या आहेत. केवळ दारूपायी तो गुन्हेगारीकडे वळल्याचे समोर आले आहे.किशोर नामदेव केदार (२३, रा. पिंपरखेड ता.घनसावंगी जि.जालना) असे पकडलेल्या दुचाकीचोराचे नाव आहे. किशोरची परिस्थिती गरीब आहे. तो औरंगाबादला असायचा. धडधाकट असतानाही काम करण्याची मानसिकता त्याची नव्हती. त्यातच मौजमजा करण्याची त्याला सवय होती. जुगार खेळण्यात तो तरबेज होता. तसेच त्याला दारूचेही व्यसन होते. पैशांची गरज भासू लागल्याने आणि नातेवाईक पैसे देत नसल्याने त्याने दीड महिन्यापूर्वी दुचाकी चोरण्यास सुरूवात केली. चार दुचाकी चोरल्यानंतर त्या विक्री करून पैसे कमवायचा त्याचा इरादा होता. बुधवारी दुपारीही तो पाचवी दुचाकी चोरण्यासाठी परळीला आला होता. याची माहिती सपोनि दिलीप तेजनकर यांना मिळाली. त्यांनी तात्काळ सापळा लावून किशोरला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून चार दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत. सध्या तो परळीतील गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यात आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिलीप तेजनकर, मुंजाबा कुवारे, विष्णू चव्हाण, आसेफ शेख, भागवत बिक्कड, सुग्रिव रूपनर यांनी केली.

टॅग्स :Beedबीडmotercycleमोटारसायकलtheftचोरी