शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

‘आका’चे पाय आता खोलात, तपास होईपर्यंत धनंजय मुंडेंनी बिनखात्याचे मंत्री राहावे - सुरेश धस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:50 IST

माजी पालकमंत्री व कृषिमंत्री यांनी काही अधिकार ‘आका’कडे दिले होते. त्यामुळे त्यांच्या शिफारशीवरूनच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग होतात...

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र जाईपर्यंत धनंजय मुंडे यांनी बिनखात्याचे मंत्री राहावे. अजित पवार यांनी त्यांना बाजूला करावे. तसेच अजित पवारांनी पालकमंत्री व्हावे. ते जिल्हा सरळ करतील, असा विश्वास भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला. तसेच आता ‘आका’चे पाय खाेलवर गेले असून, तो सुटण्याची शक्यता कमी आहे, असे सांगत वाल्मीक कराडबद्दलही नाव न घेता भाष्य केले. 

माजी पालकमंत्री व कृषिमंत्री यांनी काही अधिकार ‘आका’कडे दिले होते. त्यामुळे त्यांच्या शिफारशीवरूनच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग होतात. परळीत राखेचे भयाण वास्तव आहे. माजी पालकमंत्र्यांच्या कुटुंबातील लोकच दीडशे गुंड घेऊन जातात आणि पिचिंग तोडून राख नेतात. माझ्याकडे सर्व व्हिडीओ आहेत. आता पर्यावरण खाते बीडला आले आहे. पर्यावरण विभाग आणि प्रदूषण महामंडळाने याची तपासणी करावी, असेही आमदार धस म्हणाले.  

‘मैं कितना डेंजर हूँ...’विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात मी किती डेंजर आहे, हे दाखविण्याची चढाओढ लागली होती. त्यातूनच हा प्रकार झाला. मैं कितना डेंजर हूँ... हे वाल्मीक आण्णाला दाखविण्यासाठी सुदर्शनने मारहाण केल्याचा संशयही आमदार धस यांनी व्यक्त केला.

साडी नेसून पोलिसानेच पिस्तूल ठेवलेकरुणा मुंडे या परळीत आल्या होत्या. यावेळी त्यांच्या वाहनात साडी नेसून आलेल्या व्यक्तीने पिस्तूल ठेवले. ही व्यक्ती पोलिसच होती. हे सर्व ‘आका’च्या सांगण्यावरूनच झाल्याचा गौप्यस्फाेट आमदार धस यांनी केला. त्याचे नाव आपण पोलिस अधीक्षकांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेSuresh Dhasसुरेश धसBeedबीड