शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar: 'मराठवाडा माझी सासरवाडी म्हणून...', अखेर अजित पवारांनी तोंडावरचा मास्क काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 15:23 IST

Ajit Pawar: नेहमी मास्क वापरणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मास्क काढून भाषण करताना पाहायला मिळाले.

बीड: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Deputy Chief Minister Ajit Pawar) नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांची बोलण्याची स्टाईल असो किंवा आपल्या भाषणातून केलेली टोलेबाजी, अजित पवारांची नेहमीच चर्चा होत असते. यातच आज अजित पवारांनी मास्क काढून केलेल्या भाषणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत, तिथे एका कार्यक्रमात भाषण देत असताना त्यांनी मास्क काढल्याचे पाहायला मिळाले. 

आग्रहाचा मान ठेवून मास्क काढलाबीडमधील कार्यक्रमात भाषण देत असताना उपस्थितांनी मास्क काढून भाषण करण्याचा आग्रह केला. यावेळी अजित पवारांनी मराठवाडा आपली सासरवाडी असल्याने मास्क काढावाच लागेल, अशी मिश्कील टिपण्णी केली. यानंतर अजित पवारांनी संपूर्ण भाषण मास्कशिवाय केले. अजित पवारांच्या टिपण्णीवर कार्यक्रमात एकच हशा पिकला. दरम्यान, नेहमी मास्कमध्ये असलेले अजित पवार विना मास्क भाषण करताना पाहून सर्वजण चकीत झालेले पाहयला मिळाले.

सरकारने सर्व नियम मागे घेतलेराज्य सरकारने 31 मार्चपासून राज्यातील सर्व कोरोना निर्बंध मागे घेतले आहेत. यामुळे तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्र मास्कमुक्त झाला आहे. परंतू, अजित पवार आजही मास्क वापरताना दिसतात. कुठल्याही कार्यक्रमात ते मास्कचा नियम मोडत नाहीत. काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी मास्क ऐच्छिक केला असला तरी पण आपण काळजी घेऊन मास्क घातला पाहिजे आणि खबरदारी घेतली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले होते. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBeedबीडcorona virusकोरोना वायरस बातम्या