शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचे ऐन दिवाळीत ठेचा-भाकर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 19:28 IST

पालकमंत्र्यांनी आश्वासन पाळावे, मध्यान्ह भोजन योजना पुर्वरत सुरु करण्याची मागणी

बीड: बांधकाम मजुरांसाठी अत्यावश्यक असलेली मध्यान्ह भोजन योजना पुर्वरत सुरु करावी, तसेच पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पीक विमा अग्रिम देण्याचे आश्वासन पूर्ण करावे या मागण्यासांठी सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऐन दिवाळीत आज सकाळी ठेचा- भाकर आंदोलन सोमवारी केले.

महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारासाठी ३० आगस्ट २०२१ पासून मुंबईसह राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये मध्यान्ह भोजन योजना सुरु केली होती. नोंदणी केलेल्या कामगारांना १ रुपयात मध्यान्ह भोजन दिले जात होते. दुपारच्या जेवणामध्ये चपाती, भाजी, दाळ, भात, कोशिंबीर, गुळ यांचा समावेश होता. योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान करारनाम्यातील अटी व शर्तींच्या उल्लंघनामुळे १ नोव्हेंबर पासून मध्यान्ह भोजन योजना बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील असंख्य बांधकाम कामगारांची उपासमार होत आहे.

बीड जिल्ह्यात मध्यान्ह भोजन योजनेचे काम अगदी सुरळीतपणे सुरु होते. परंतु इतर जिल्ह्यात या योजनेत अपहार झाल्याचे निदर्शनास आल्याने अपहार करणारांवर कारवाई करण्याऐवजी योजनाच बंद करण्याचा शासन निर्णय अन्यायकारक आहे. यामुळे गोरगरीब बांधकाम कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे पुन्हा ही योजना सुरु करावी अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, रामनाथ खोड, अनिल घुमरे, शेख युनुस, सुदाम तांदळे, शेख मुबीन, धनंजय सानप, शिवशर्मा शेलार आदि सहभागी होते.

पालकमंत्र्यांनी आश्वासन पाळावेकृषीमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा अग्रीम रक्कम जमा होईल. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अग्रिम मिळाला नाही तर दिवाळी साजरी करणार नाही, असे आश्वासन दिले होते. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम जमा झाल आहे तर काही शेतकऱ्यांना अग्रिम मिळालेला नाही. पालकमंत्र्यांनी आपला शब्द पाळून अग्रिम देण्यासाठी सूचना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.

टॅग्स :Beedबीडagitationआंदोलन