शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वय ४०, अगोदर दोन लग्न तरीही १६ वर्षांच्या मुलीला घेऊन ठोकली धूम

By सोमनाथ खताळ | Updated: December 27, 2023 19:40 IST

आरोपीच्या अटकेसाठी कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

बीड : अगोदर दोन लग्न झालेल्या ४० वर्षांच्या व्यक्तीने शेजाऱ्याच्याच १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून धूम ठोकली. ही घटना परळी तालुक्यात घडली आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल होऊनही तीन महिन्यांपासून सिरसाळा पोलिसांनी मुलगी व आरोपीचा शोध लावला नाही. अखेर व्यथीत झालेल्या कुटुंबाने बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे, असे असतानाही पोलिसांकडून याची कसलीच दखल घेतलेली नाही.

पीडितेचे वडील आणि आरोपी या दोघांची शेजारीच शेती आहे. आरोपीचे अगोदरच दोन विवाह झालेले आहेत. परंतु, तरीही त्याने शेजारीच असलेल्या १६ वर्षांच्या मुलीला आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला फूस लावून पळवून नेले. नातेवाइकांनी तत्काळ सिरसाळा पोलिस ठाणे गाठून २० ऑक्टोबर २०२३ रोजी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतरही आरोपीच्या अटकेसाठी पोलिस ठाण्याच्या पायऱ्या झिजवल्या.

परंतु, पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबाने माजलगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी, अंबाजोगाईच्या अपर पोलिस अधीक्षक यांच्याकडे धाव घेतली. त्यांना लेखी तक्रार व निवेदन दिले. परंतु, यावर कोणीही काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे पीडितेचे कुटुंब आता न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहे. बुधवारी पीडितेच्या आई - वडिलांसह चार मुले व इतर नातेवाइक यांचा उपोषणात सहभाग होता. आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असा पवित्रा या नातेवाइकांनी घेतला आहे. यावेळी ॲड. राजेश शिंदे, आण्णासाहेब मतकर, इंजि. विष्णू देवकते यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेतली.

लवकरच आरोपीला शोधूआमच्याकडून तपास केला जात आहे. आरोपीला सहकार्य करणारा त्याचा भाऊजी यालाही आम्ही अटक केली होती. त्यानंतर हैदराबाद व इतर ठिकाणीही जाऊन आलो आहोत, तरीही ते सापडले नाहीत. आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु, यश येत नाही. लवकरच आरोपीला शोधून मुलगी नातेवाइकांच्या स्वाधीन करू.- संदीप दहिफळे, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस ठाणे, सिरसाळा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड