शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जामिनावर बाहेर येताच पुन्हा लिंगनिदानाचा धंदा; बडतर्फ अंगणवाडीसेविका ताब्यात, डॉक्टर फरार

By सोमनाथ खताळ | Updated: January 4, 2024 17:12 IST

हा प्रकार आज पहाटे ६ वाजेच्या सुमारास गेवराईतील संजयनगर भागात घडला.

बीड : दीड वर्षापूर्वी अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी असलेल्या जालन्याच्या डॉक्टरसह गेवराईच्या बडतर्फ झालेल्या अंगणवाडी सेविकेने जामिनावर बाहेर येताच पुन्हा हा बाजार सुरू केला. याची तक्रार येताच पोलिस व आरोग्य विभागाने कारवाईसाठी सापळा लावला. एक महिलेला डमी रुग्ण बनवून तपासणीला पाठविण्यात आले. तपासणीला सुरुवात करताच यातील अंगणवाडी सेविका आणि घरमालकाला ताब्यात घेण्यात आले. परंतु, जालन्याच्या डॉक्टरने तेथून पळ काढला. हा प्रकार गुरुवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास गेवराईतील संजयनगर भागात घडला. याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात आहे.

मनीषा शिवाजी सानप (वय ४०, रा. अर्धमसला, ता.गेवराई) व चंद्रकांत पांडुरंग चंदनशिव (वय ४५, रा. संतोषनगर, गेवराई) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, जालन्याचा डॉ. सतीश गवारे हा फरार झाला आहे. गेवराईत अवैध गर्भलिंग निदान केले जात असल्याची तक्रार राज्याच्या आरोग्य विभागाकडे आली होती. त्याप्रमाणे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अशोक बडे यांनी पाेलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेऊन सापळा लावण्याचे निश्चित केले. गुरुवारी सकाळी डमी रुग्ण तपासणीसाठी पाठविण्यात आले. गेवराईतील एका घरात नेऊन तिची तपासणी सुरू केली. याच दरम्यान, अंगणवाडी सेविका मनीषा सानप हिला पकडले. सोबतच बाहेर उभा असलेला घरमालक चंदनशिव यालाही दबा धरून बसलेल्या पथकाने पकडले. परंतु, डॉ. गवारे हा तेथून पळून गेला. या तिघांविरोधातही गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

यांनी केली कारवाईजिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.मोहमंद नोमानी, डॉ.राजेश शिंदे, डॉ.गोपाळ रांदड, ॲड.निलेश जोशी, सुनिता शिंदे, राजु काळे, माने, गणेश नाईकनवरे, वखरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे, एएचटीयूच्या सहायक पोलिस निरीक्षक सुरेखा धस, उपनिरीक्षक जगदीश मोरे, हवालदार पी.टी.चव्हाण, गणेश हंगे, नारायण कोरडे, सुनिल राठोड, चंद्रभागा मुळे, मनिषा राऊत, सतिश बहिरवाळ, विकास नेवडे, हेमा वाघमारे, रेखा गोरे, अनिता खरमाटे, सविता सोनवणे, प्रतिभा चाटे, कौशल्या ढाकणे आदींनी केली. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांनी यासाठी मार्गदर्शन केले होते.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी