शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

एक महिन्यानंतरही परिवर्तन मल्टीस्टेट घोटाळ्यातील आरोपी मोकाट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 15:53 IST

अनेक ठेवीदारांनी परिवर्तन मल्टीस्टेटच्या अध्यक्ष व संचालक मंडळाविरोधात १२ एप्रिलला गुन्हा दाखल केला आहे. यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला.

माजलगांव (बीड ) :  अनेक ठेवीदारांनी परिवर्तन मल्टीस्टेटच्या अध्यक्ष व संचालक मंडळाविरोधात १२ एप्रिलला गुन्हा दाखल केला आहे. यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला. मात्र, या प्रकरणाला आता महिना पूर्ण होईल तरीही अद्याप  एकाही संचालकाला पोलिसांनी अटक केली नाही. 

शहरातील परिवर्तन मल्टीस्टेट, सामाजिक परिवर्तन पतसंस्थेचा अध्यक्ष विजय अलझेंडे याच्यासह संचालक मंडळाने ज्यादा व्याजदराचे आमिष दाखवून कोट्यावधीच्या ठेवी गोळा केल्या. प्राथमिक माहितीनुसार शेकडो ठेवीदारांनी अठरा ते वीस टक्के व्याजाच्या आमिषाने जवळपास २५ ते ३० कोटी रुपयाच्या ठेवी ठेवल्या. यानंतर या ठेवी परत देण्यास पतसंस्थेने टाळाटाळ केली. यामुळे शेकडो ठेवीदारांनी पतसंस्था अध्यक्ष विजय अलझेंडेसह संचालक मंडळ अशा ३६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे शाखा बीड यांच्याकडे सोपवण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत ८० ठेवीदारांनी पोलिसात धाव घेतली आहे. 

पोलिसांचा अजून तपासच सुरु दरम्यान, गुन्हा दाखल होऊन एक महिन्याचा कालावधी उलटत आहे. तरीही पोलीस अजूनही तपासच करत असून त्यांनी अद्याप कोणत्याही आरोपीळा अटक केले नाही. यामुळे यातील आरोपी उजळ माथ्याने शहरात वावरताना दिसतात. तसेच सोमवारी न्यायालयाने यातील पाच आरोपींचे अटकपूर्व जामीन फेटाळले असल्याने त्यांच्यासह इतर आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी ठेवीदारांमधून होत आहे.

फसवणुकीचा आकडा ७ कोटींवर पोलिसात दाखल तक्रारीत ठेवीदारांनी ठेवीच्या पावत्या जमा केल्या आहेत. यावरून हे प्रकरण ७ कोटी रुपयाच्या फसवणुकीचे आहे असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार काही लोकांनी आयकरचा ससेमिरा मागेलागु नये म्हणून ठेवीचा आकडा कमी सांगितल्याचे बोले जात आहे. यानुसार फसवणुकीचा खरा आकडा जवळपास ३० कोटीच्या घरात जातो.

लवकरच आरोपींना ताब्यात घेऊ या प्रकरणी तपास सुरु आहे. आम्ही सर्व कागदपत्रे बारकाईने तपासत आहोत. यामुळे आरोपींना अटक करण्यास उशिर होत आहे. लवकरच तपासाचे काम पूर्ण करून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात येईल. - मारुती शेळके, सहाययक पोलीस निरीक्षक,आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा

टॅग्स :Crimeगुन्हाfraudधोकेबाजीBeed policeबीड पोलीस