शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

CM Eknath Shinde : 'लाडकी बहीण योजनेनंतर आता 'आमचा लाडका शेतकरी योजना' राबवणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 19:59 IST

CM Eknath Shinde : आज राज्य सरकारने बीडमध्ये कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे, या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली.

CM Eknath Shinde ( Marathi News ) : "आमच्या सरकारचे काम म्हणजे शेतकऱ्याच्या पिकाला थेट मार्केट देण्याचं काम आहे. आमच्या सरकारचं एकच धोरण आहे, कष्टकरी, वारकरी सुखी शेतकरी अशा प्रकारचे आपण धोरण राबवत आहे. म्हणून मी आज तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आली, लाडका भाऊ योजना आली. या योजनांची आम्ही घोषणा केली, त्या योजना सुरूही केल्या. आता आम्ही 'आमचा लाडका शेतकरी योजना' सुरू करणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आज बीडमध्ये राज्य सरकारने कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेची घोषणा केली. 

MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: आयोगाची उद्या महत्त्वपूर्ण बैठक, काय निर्णय होणार?

"केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान हे देणारे आहेत. त्यामुळे आज मी त्यांच्याआधी बोलत आहे, मी शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकडे काहीतरी मागणार आहे, असंही शिंदे म्हणाले. 'शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारे आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही ऑफिसमध्ये बसून फेसबुक लाईव्ह करणारे नाहीत. आम्ही बांधावर जातो, असा टोलाही सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला, शेतकऱ्यांवर दुहेरी संकट येत असतं. जेव्हा नुकसान होतं तेव्हा आम्ही मदत करताना नियम बाजूला ठेवतो. आमच्या महायुतीच्या सरकारने लगेच मदत देण्याचं काम सुरू केलं, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. 

कांदा आणि दूध प्रश्नावर बैठक घेणार

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, एक रुपयात विमा योजना देणार हे राज्य पहिलं आहे. किसान सन्मान निधातून केंद्र आणि राज्यातून आपण मोठा निधी दिला आहे. आमही शेतकऱ्यांना दिलेलं कधीही काढत नाही. विरोधक म्हणतात शेतकऱ्यांना काय दिल? आम्ही हे कधीही काढत नाही. आज राज्यातील शेतकऱ्यांचा कांद्याचा आणि दुधाचा प्रश्न सोडवायचा आहे. यासाठी तुम्ही थोडा प्रयत्न करा, अशी विनंतीही एकनाथ शिंदे यांनी शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली. आमच्या शेतकऱ्यांच्या कापसाला आणि सोयाबिनला चांगला भाव मिळाला पाहिजे, सोयाबिनला हेक्टरी पाच हजार आणि कापसाला पाच हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेतोय. यात दोन हेक्टर पर्यंत मर्यादा असेल, अशी घोषणाही सीएम शिंदे यांनी केली. 

"आपण साडे सात शेतीपंपाचे वीजबिलही माफ करत आहे, विरोधक मागच काय विचारत आहेत. आम्ही पुढचं बिल घेणार नाही, पुढचं का घेऊ. सरकार आता यापुढे शेतकऱ्यांकडून विजबिलाचे पैसे घेणार नाही, असंही शिंदे म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेFarmerशेतकरीShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस