शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड मजूरांचा संप मागे, लढा मात्र कायम सुरु राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:37 IST

लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूक दार संघटनेच्या वतीने, ऊसतोड मजूर, मुकादमांच्या विविध मागण्या मान्य होईपर्यंत हातात कोयता न घेण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान ऊसतोड मजूरांचा संप मागे घेण्याचा निर्णय शनिवारी पत्रकार परिषदेत संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आला.

ठळक मुद्देकेशव आंधळे : निर्णय घेण्यासाठी ३० आॅक्टोबरचा अल्टीमेटम

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूक दार संघटनेच्या वतीने, ऊसतोड मजूर, मुकादमांच्या विविध मागण्या मान्य होईपर्यंत हातात कोयता न घेण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान ऊसतोड मजूरांचा संप मागे घेण्याचा निर्णय शनिवारी पत्रकार परिषदेत संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आला. यावेळी बोलताना माजी आमदार केशव आंधळे म्हणाले, संप जरी मागे घेतला असला, तरी मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरुच राहणार आहे.पत्रकारपरिषदेस गोरक्ष रसाळ, संघटनेचे अघ्यक्ष श्रीमंत जायभाये व इतर मुकादम उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आंधळे म्हणाले, दुष्काळी परिस्थिती आहे. मजूरांच्या हाताला काम देणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतात उभा असलेला ऊस कारखान्याला जाणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे हा संप मागे घेण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने घेतला आहे. महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड मजूरांचे प्रश्न सुटणार आहेत. आम्ही केलेल्या मागण्यापैकी अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत. ज्या मागण्या मान्य झाल्या नाहीत त्यासाठी संघटना कायम लढत राहील. ऊसतोड मजूरांच्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शासनाकडे वेळोवेळी पाठपुरवा केला आहे. एक वेळ लवादाचे अध्यक्ष, सर्व सदस्य व मुख्यमंत्र्याशी चर्चा केली आहे. लवकरच महामंडळाचा देखील प्रश्न निकाली लागेल अशी आशा आंधळे यांनी यावेळी व्यक्त केली.महामंडळाऐवजी काढला योजनेचा अध्यादेशऊसतोड मजूरांच्या मजूरीचा वाढ करण्याचा निर्णय शासनाने तात्काळ घ्यावा, यासाठी शासनाला ३० आॅक्टोबर ही शेवटची तारीख देत आहोत, मागण्या मान्य झाल्या नाही तर, साखर संघाच्या इमारतीसमोर धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी संघटनेतर्फे देण्यात आला. ऊसतोड मजूरांना ४०० रुपये मजूरी मिळावी, त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात यावी, मजूरांना जिवन सुरक्षा योजना लागू करावी, यासह इतर सर्व लाभ ऊसतोड मजूरांना मिळावेत या मागण्यांसाठी संघटनेने संप पुकारला होता.सावरगाव येथील दसरा मेळाव्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घोषणा केली होती. लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना १९ तारखेचा दिवस मावळण्याच्या आत होईल व महामंडळासाठी १०० कोटी रुपये निधीची तरतूद केली जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र, महामंडळाची घोषणा झाली नाही व शुक्रवारी १९ आॅक्टोबर रोजी शासनाच्या वतीने ‘लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार समाजिक सुरक्षा’ ही योजना राबवण्याचा अध्यादेश काढला.

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखाने