शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचारानंतर अल्पवयीन गतिमंद मुलगी गर्भवती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 06:31 IST

पीडितेच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून पुणे पोलिसांनी झीरो एफआयआर दाखल केला. त्यानंतर हे प्रकरण परळी तालुक्यातील सिरसाळा पोलिसांकडे वर्ग केले. 

बीड / सिरसाळा : चिंचा खाण्याचा बहाणा करून एका गतिमंद अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना परळी तालुक्यात घडली. पोट दुखत असल्यामुळे पीडितेच्या आजीने तिला पुणे शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारानंतर ती गर्भवती असल्याचे उघड झाले. पीडितेच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून पुणे पोलिसांनी झीरो एफआयआर दाखल केला. त्यानंतर हे प्रकरण परळी तालुक्यातील सिरसाळा पोलिसांकडे वर्ग केले. 

परळी तालुक्यातील एका गावामध्ये पीडित मुलगी त्यांच्या आई-वडील व आजीसह वास्तव्यास आहे. पीडितेचे आई-वडील ऊसतोडणीसाठी मागील सहा महिन्यांपासून कर्नाटक राज्यात गेले आहेत. पीडित मुलगी गतिमंद आहे, तर घरातील एका वृद्ध महिलेस दिसत नाही म्हणून त्या दोघी घरीच असतात. दरम्यान, त्यांच्या घरातील महिला सदस्य उषा (नाव बदलले आहे) ऊसतोडीला गेल्या असल्याने पीडिता व तिची आजी असे दोघेच घरी होत्या.

ऊसतोडीवरून उषा परत आल्या असता, त्यांना पीडित मुलीचे पोट फुगलेले दिसले. त्याबाबत सासूकडे विचारणा केली असता, कावीळचे औषध दिले असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यानंतर १५ मार्च रोजी उषा यांनी पीडितेस बरे वाटावे म्हणून पुणे जिल्ह्यातील पानशेत येथे नातेवाइकाकडे घेऊन गेल्या. दरम्यान, १८ मार्च रोजी पीडितेला अचानक त्रास होऊ लागला. त्यामुळे पुणे येथील एका दवाखान्यात नेले असता, डॉक्टरांनी तपासणी करून ती अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. 

पीडितेला घेतले विश्वासात महिला पोलिसांनी पीडितेला विश्वासात घेत विचारणा केली असता, तिने सांगितले की, उषा या ऊसतोडीला गेल्या असता, गावातील एका व्यक्तीच्या घरी जात होते. त्या ठिकाणी राहुल नामक एक व्यक्ती येत होता. तू मला फार आवडतेस, असे म्हणायचा. परंतु मी त्याला काहीही बोलत नव्हते. कधी-कधी राहुल हा कोपीमध्ये यायचा व अंगाला हात लावायचा. एक दिवस राहुल कोपीमध्ये आला, मला चिंच खायला दिली व त्यानंतर माझ्यावर अत्याचार केला. घाबरलेले असल्याने कोणालाही काही सांगितले नाही.  पोलिसांनी सर्व प्रकार ऐकल्यानंतर उषा यांच्या फिर्यादीवरून राहुल (नाव पूर्ण नाही) याच्याविरुद्ध पुणे येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मुस्कान फाउंडेशनच्या समुपदेशक पूनम गायकवाड यांनी पीडितेस सहकार्य केले. पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून सिरसाळा पोलिसात वर्ग केला आहे.

टॅग्स :Beedबीड